Main Featured

10 हजार रुपयांची आर्थिक मदत व स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची घोषणा करावी : पुरोगामी वृतपत्र विक्रेता संघटना

राज्यात कोरोना (Corona) महामारीने थैमान घातले आहे. कोरोना काळात वृतपत्र विक्रेत्यांनाही आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे राज्य सरकारने वृतपत्र विक्रेत्यांना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत व स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची घोषणा करावी, अशी मागणी पुरोगामी वृतपत्र विक्रेता संघटनेने सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोइटे यांच्याकड़े निवेदनाद्वारे केली आह.

संघटनेचे अध्यक्ष शिवगोडा खोत यांनी, वृत्तपत्र विक्रेता हा वृत्तपत्र व्यवसायातील महत्वाचा घटक असून तो असंघटीत आहे. या लॉकडाऊन काळात वृत्तपत्र विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने जीवन जगणे मुश्किलीचे बनले आहे. या गर्तेतून बाहेर येण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असून शासनाने दहा हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी. त्याचबरोबर वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना केल्यास त्यातून त्यांचे जीवन सुखकर होणार आहे, असे सांगितले. या सर्वासाठी मदत मिळावी म्हणून 252 वृत्तपत्र विक्रेत्यांची यादी सहाय्यक कामगार आयुक्तांकडे लेखी अर्ज सर्व माहिती सादर केली.

यावेळी संघटनेचे सचिव अण्णा गुंडे, शिवानंद रावळ, नारायण शिंदे, अमोल मुसडी, महेश बावळे, भालचद्र कांबळे, महादेव चिखलकर, विजय वाईंगडे, कृष्णा हजारे, सदाशिव पाटील, धोंडीराम कदम, हातकणंगले वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष सुनिल पाटील, संतोष डुणुंग, आण्णासो पाटील, राजू शिंदे, शिरोळ वृत्तपत्र संघटनेचे सचिव धनंजय सावंत आदी उपस्थित होते.