Main Featured

10 हजार महिलांचा ‘करो या मरो’ मोर्चा : छत्रपती शासन महिला आघाडीइचलकरंजी येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. आर्थिक परिस्थिती खालावली असतानाही कर्ज वसुलीसाठी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून जबरदस्तीने केली जात आहे. मायक्रो फायनान्सच्या या बेकायदेशीर वसुलीच्या कचाट्यातून गोरगरीब महिलांना सोडवण्यासाठी आणि या प्रश्‍नी झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला जागे करण्यासाठी  (Do or die front) मंगळवार 22 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील 10 हजार महिलांचा ‘करो या मरो’ मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर (Collector's Office) काढण्यात येणार आहे, अशी माहिती छत्रपती शासन महिला आघाडीच्या संस्थापिका सौ. दिव्याताई मगदुम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

MUST READ 

1) एटीएममधून १० हजारांपेक्षा अधिक रक्कम काढताय? लागू होणार ‘हा’ नवा नियम


2) सुरेश रैनाच्या काका आणि चुलत भावांचे मारेकरी सापडले


3) आधी माझी तपासणी करा सांगत तरुण तरुणीची दादागिरी, रुग्णांचे स्वॅब फेकून दिले


4) PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी, या 5 चुका केल्यास काढता येणार नाही खात्यातील रक्कम


5) The best student laptops 2020

त्या म्हणाल्या(Do or die front) की, कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गत सहा महिने शासनाने लॉकडॉऊन पुकारला होता. त्यामुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले. अशातच मायक्रो  फायनान्स  (Microfinance) कंपन्यांच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या महिलांकडून वसुली अधिकारी जबरदस्तीने कर्जवसुली करत आहेत. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या महिलांनी दागिने, घरातील वस्तु विकुन कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न केला. अनेक महिला कर्जफेडीच्या विचाराने व सक्तीच्या वसुलीमुळे डिप्रेशनमध्ये गेल्या आहेत.