Main Featured

अधिकारी आणि मक्तेदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी


 


इचलकरंजी येथे औद्योगिक आणि मैलायुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या इचलकरंजीतील दोन्ही प्रकल्पातून विना प्रकिया ओढ्यावाटे पंचगंगा नदीत पाणी सोडलं जात आहे. यामुळं आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पर्यावरण संरक्षण समितीचे सदस्य संतोष हत्तीकर यांनी नदी प्रदूषणास जबाबदार धरून नगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि मक्तेदार यांच्यावर मनुष्य वधाचा फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडं केली आहे.

Must Read





इचलकरंजी शहरातील मैलायुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी प्रकल्प तर औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी प्रकल्प उभाण्यात आला आहे. मैलायुक्त सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी टाकवडे वेस इथं संपवेल असून सांगली नाक्यावर मलनिसारण प्रकल्प आहे. या ठिकाणावरून अनेकवेळा विना प्रक्रिया मैलायुक्त सांडपाणी थेट काळ्या ओढ्यात सोडलं जातं. याचप्रमाणं सीईटीपी प्रकल्पातील रसायनयुक्त सांडपाणीही ओढ्यात सोडलं जातं. हे मैलायुक्त आणि रसायनयुक्त सांडपाणी ओढ्यातून थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्यानं नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो.