Main Featured

महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी : अखिल भारतीय जनवादी महिला संघटना


                                         eletricity 

इचलकरंजी येथे वाढीव वीज बिलाच्या विरोधात आज इचलकरंजतील महावितरण कार्यालयासमोर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्यावतीनं वीज बिलांची होळी करण्यात आली. तर याच मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महावितरण (Demand for electricity bill waiver)कार्यालयाला टाळं ठोकण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना रोखलं. आंदोलनामुळं कार्यालयासमोर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळं 4 महिने सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र अशा परिस्थितीत महावितरण कंपनी ग्राहकांना वाढीव दरानं वीज बिलं पाठवतच होती. हाताला काम नसल्यानं प्रपंच चालवणं अवघड झालं असताना जादा दराची विज बिलं भरण्यास ग्राहकांना तगादा लावला जात आहे. त्यामुळं महिन्याला 200 युनिटपर्यंतचं वीज बिलं माफ करण्याची मागणी होत आहे. स्थानिक पातळीपासून राज्यपातळीपर्यंत या मागणीसाठी आंदोलनंही सुरू आहेत. अखिल भारतीय जनवादी (Demand for electricity bill waiver)महिला संघटनेनंही वीज दरवाढ मागे घ्यावी आणि वीज बिल माफ करण्याच्या मागणी केली आहे. 

या मागण्यांसाठी आज इचलकरंजी इथं स्टेशन रोडवरील महावितरण कार्यालयासमोर सरकारचा निषेध करत वीज बिलांची होळी करण्यात आली. यावेळी संघटनेच्या मुमताज हैदर यांनी वीज बिल माफ न केल्यास या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. आंदोलनात ए.बी. पाटील, चंद्रकला मगदुम, जरीना सुतार, अनिता वड्ड यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या. दरम्यान आम आदमी पार्टीच्यावतीनं महिन्याला 200 युनिटपर्यंतचं वीज बिल माफ करावं आणि वीज दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी महावितरण कार्यालयाला टाळं ठोकण्याचा प्रयत्न झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकाना रोखलं. आंदोलनात प्रकाश सुतार, जावेद मुल्ला, प्रमोद परीट, वसंत कोटगी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

इचलकरंजी, प्रतिनिधी - रोजगार नसल्यानं असंघटीत कामगारांची उपासमार होत आहे. त्यामुळं कामगार आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना महिन्याला 35 किलो धान्य मिळावं तसंच वृद्ध, निराधार, अपंगांची थकीत पेन्शन देण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळानं इचलकरंजीतील पुरवठा अधिकार्‍यांकडं केली आहे. मागण्यांची त्वरीत पुर्तता न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

हे वाचा

इचलकरंजी शहरात 52 हजार 409 केशरी शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना लॉकडाऊन कालवधीत रेशनवर मे आणि जुन महिन्याचं सवलतीच्या दरात धान्य मिळालं. मात्र त्यानंतर धान्य मिळालं नाही. अद्याप अनेकांना रोजगार नसल्यानं कामगारांची उपसमार होत आहे. वृद्ध, निराधार, परितक्त्या, अपंगांनाही 5 महिन्याची पेन्शन मिळाली नाही. त्यामुळं असंघटीत कामगार, केशरी शिधापत्रिकाधारकांना महिन्याला 35 किलो धान्य मिळावं आणि वृद्ध, निराधार, परितक्त्या, (Demand for electricity bill waiver)अपंगांची थकीत पेन्शन त्वरीत देण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केली आहे.

 या मागणीसाठी शिष्टमंडळानं पुरवठा अधिकार्‍यांची भेट घेऊन निवेदन दिलं. मागण्यांची त्वरीत पुर्तता न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. शिष्टमंडळात दत्ता माने, भरमा कांबळे, धनाजी जाधव, सदा मलाबादे, सुभाष कांबळे, आंबादास कुनगिरी, नुरमहंमद बेळकुडे, याशीन भुई यांचा समावेश होता.