Main Featured

कंगनाविरुद्ध अखेर गुन्हा, उद्धव ठाकरेंची बदनामी! अब्रूनुकसानीचा खटला चालणार


                                         kangna ranaut and uddhav thakre

अभिनेत्री कंगना राणावत (Actress Kangana Ranaut) वर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी केलेल्या विधानांवरून शिवसेनेनं टीका केली होती. त्यानंतर हा वाद चिघळत गेला. यात महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयाचा अनधिकृत भाग पाडल्यानंतर तिने संताप व्यक्त केला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा उल्लेख तीने एकेरी भाषेत केल्यामूळे कंगनावर मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे.कंगनाने काल मुंबईत येताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यात तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी ("Today my house is broken, tomorrow my pride will be broken)उल्लेख केला होता. आज माझं घर तुटलंय, उद्या घमंड तुटेल, असे म्हणत कंगनाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. तिचे वक्तव्य बदनामीकारक असल्याचे सांगत तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या सुरक्षेत कंगना काल घरी पोहोचली. मुंबईत येताच तिने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. या व्हिडिओत तिने उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला. यामुळे राज्यभरात तिच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

हे वाचा

कंगनानं केलेल्या या टीकेवर नाराजी व्यक्त होत असताना मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला ("Today my house is broken, tomorrow my pride will be broken)आहे. नितीन वसंत माने असं तक्रार देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. तसेच, दुसरा गुन्हा दिंडोशीयेथे दाखल करण्यात आला आहे. कंगनाने सेनेला निशाणा करत टीकेची झोड उठवली होती त्यावरुन आथा तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे