इचलकरंजी येथे बांधकाम कामगारांना शासनाने कामगार कल्याण मंडळाने जाहीर केलेले कोविड अनुदान तातडीने देण्यात यावे, कामगार कार्यालयातील ऑनलाईन कामकाजाची पध्दत बंद करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्तांना दिले. या मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

Must Read

1) महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले

2) मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस photo

3) 'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत

4) 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर

5) आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना बैलगाडीने प्रवास करावा लागतो..

हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात बांधकाम कामगारांची संख्या लक्षणीय आहे. नवीन कामगारांची नोंदणी आणि दरवर्षी नुतनीकरण करण्याचे काम ऑनलाईन पद्धतीने केले जाते. परंतु येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात कामगारांची नोंदणी आणि नुतनीकरणाचे काम वर्षभरापासून ठप्पच आहे. कामगार कल्याण मंडळाने जाहीर केलेले कोविड अनुदानही अनेक कामगारांना मिळालेले नाही. त्याचबरोबर विविध शासकीय योजनांच्या लाभापासूनही कामगार वंचित आहेत. त्यामुळे कल्याण मंडळाने दोन टप्प्यात जाहीर केलेले 5 हजार रुपये कोविड अनुदान तातडीने मिळावे, ऑनलाईन कामकाजाची पध्दत बंद करावी, अवजारे खरेदीचे 5 हजार अनुदान तातडीने द्यावे यासह विविध मागण्या कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने सातत्याने केल्या जात आहेत.

या मागण्यांकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी शिष्टमंडळाच्यावतीने येथील सहाय्यक कामगार आयुक्त भोईटे यांची भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केली. भोईटे यांनी कार्यालय स्तरावरील मागण्या मार्गी लावण्यासह उर्वरीत मागण्या वरीष्ठ पातळीवर कळवण्याची ग्वाही दिली. यावेळी आनंदा गुरव यांनी मागण्यांबाबत त्वरीत निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. शिष्टमंडळात राजेंद्र निकम, बंडोपंत सातपुते, संजय खानविलकर, बापू कांबळे, कुमार कागले यांचा समावेश होता.