Main Featured

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा नवा उच्चांक


Kolhapur News- जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश: कहर केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर सहा महिन्यांनी प्रथमच आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह बुधवारी आढळून आले. आज दिवसभरात 1,316 कोरोनाबाधित असल्याची नोंद करण्यात आली.


एक हजारपेक्षा जास्त बाधित असल्याचा नवा उच्चांक नोंदविला गेल्याने कोल्हापुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नव्या रुग्णवाढीने जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 32,008 झाली आहे. गेल्या चोवीस तासांत 24 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले.


हे वाचा

2) Kolhapur - नगराध्यक्ष पदावर टांगती तलवार
कोल्हापूर शहरातील रुग्णसंख्या दहा हजारांच्या टप्प्यावर


गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आजही शहरात 385 इतके नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील एकूण बाधितांची संख्या 9 हजार 986 इतकी झाली आहे. गुरुवारी शहरातील बाधितांची संख्या दहा हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.


Kolhapur News- जिल्ह्यात 24 जणांचे मृत्यू


आज दिवसभरात जिल्ह्यात 24 जणांचे मृत्यू झाले. गौरव पाटील या 44 वर्षीय मोटारसायकल रायडरचा आज खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांना खोकला आणि ताप असा त्रास असल्याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. चांगली शरीरयष्टी अशी ओळख असलेल्या पाटील यांनी 1995-96 पासून कायनेटिक रायडर म्हणून सुरुवात केली होती. देशभरातील विविध स्पर्धा त्यांनी गाजवल्या होत्या. 2017 ला त्यांनी गोव्यात रायडर मेनिया स्पर्धेत ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’चा किताब पटकावला होता. त्यांची मुलगीही रायडर असून, मंगळवारीच तिची एका कंपनीसाठी निवड झाली आहे.