Main Featured

नियमांचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात मोहिम सुरु
 नियमांचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात आता पोलिसांनी कारवाईची मोहिम सुरु केली आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी इचलकरंजीसह कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत 344 जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण  37 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला.

Must Read

शहर आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरु आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी आता प्रशासनासोबत पोलिसांनाही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, हॅण्डग्लोज न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळणे आदी विरुध्द पोलिसांनी कारवाईची मोहिम सुरु केली आहे. 

या अंतर्गत गावभाग पोलिसांनी 18, शिवाजीनगर पोलिसांनी 78, शहापूर पोलिसांनी 40, वाहतूक नियंत्रण शाखेने 132 तर कुरुंदवाड पोलिसांनी 76 जणांवर कारवाई केली. शिवाजीनगर पोलिसांनी सोशल डिस्टन्सिंग न पाळणार्‍या दोघांवर दंडात्मक कारवाई केली. एकूण 37 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे.