Main Featured

"वीज ग्राहकांचे हक्क" पुस्तकाचा प्रकाशन सोहळा : वीजतज्ञ प्रताप होगाडे


 

इचलकरंजी येथे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, वीज निर्मिती, पारेषण, वितरण व ग्राहक हक्क या क्षेत्रातील अभ्यासक आणि गेली 20 वर्षे सातत्याने वीज ग्राहकांच्या हक्कासाठी सर्व सनदशीर मार्गानी लढा देणारे वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी राज्यातील वीज ग्राहकांच्या माहितीसाठी, हितासाठी व जागृतीसाठी  वीज ग्राहकांचे हक्क  हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महात्मा गांधी जयंती दिनी 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता येथील समाजवादी प्रबोधिनी येथे संपन्न होत आहे.

Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर मुंबई संघटनेचे उपाध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लॉकडाऊन विषयक मर्यादा मुळे सर्व शासकीय सूचनांचे पालन करून मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. सर्वसामान्य घरगुती, व्यावसायिक, शेतकरी व औद्योगिक या सर्व वीज ग्राहकांना त्यांचे हक्क, कर्तव्ये व चळवळीचे ज्ञान व्हावे, त्यांचे हक्क प्रस्थापित व्हावेत व त्यांना लढ्याची प्रेरणा मिळावी या दृष्टीने हे पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शक ठरणार आहे.