Attack-on-Assistant-Commissioner

लक्ष्मी मार्केट जवळील बोकड चौक येथे फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढत असताना महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्यावर जमावाने हल्ला केला. लोखंडी सळईने त्यांना मारहाण करण्यात आली. तर या घटनेचा मोबाईलमध्ये व्हीडीओ करणाऱ्या महापालिकेच्या Municipal Corporation 

Advertise

कर्मचाऱ्याचा गळा दाबून त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेण्यात आला. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. दोनच दिवसांपूर्वी एका मुकादमाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती. यामध्ये संबंधीत सहाय्यक आयुक्त गायकवाड यांच्याबाबतही अर्वाच्य भाषा वापरली. त्याचवेळी जर कारवाई झाली असती तर आजच्या प्रकाराला चाप बसला असता अशी चर्चा शहरात होती. काही लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे प्रत्येकवेळी अधिकारी तक्रार देण्यास धजावत नसल्याने असे प्रकार वारंवार घडत आहेत.

बुधवारी दुपारी सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मी मार्केट परिसरातील फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवित असताना अचानक बोकड चौक येथे फेरीवाल्यांचा जमाव जमला. त्यांनी गायकवाड यांना शिवीगाळ करीत हुज्जत घातली. काहीजण त्यांच्या अंगावर धावून गेले. लोखंडी सळईने मारण्याचा प्रयत्न झाला. या घटनेचा व्हिडीओ महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा कर्मचारी होता. त्यावेळी त्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून घेण्यात आला. तसेच मोबाईलमधील व्हिडीओ डिलीट करुन मारहाणीचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सहाय्यक आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱयालाच जमावाने मारहाण केल्याने शहरात खळबळ माजली.

लोकप्रतिनिधींच्या पाठबळानेच हल्ले वाढले
दोनच दिवसांपूर्वी अशाच एका अतिक्रमणाच्या कारणावरुन एका मुकादमाला दूरध्वनीवरुन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती. यामध्ये सदर गायकवाड यांच्याबाबतही असभ्य भाषा वापरण्यात आली होती. मात्र, लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. त्यावेळीच तक्रार दाखल करुन कारवाई झाली असती तर आजची मारहाण करण्याची हिम्मत झाली नसती, अशी चर्चा महापालिका कर्मचाऱ्याच्यात होती. काही लोकप्रतिनिधी वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारांना पाठबळ देत असल्यानेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे धारिष्टय़ फेरीवाले करीत आहेत.