Main Featured

दमदार फीचर्ससह Apple Watch 6 लाँच


Apple-Watch-Series-6

Apple Watch Series 6 अ‍ॅपलने आपल्या नव्या उत्पादनांची सीरिज लाँच केली आहे. आयपॅड, आयपॅड एअर, अ‍ॅपल वॉच या उत्पादनांचा त्यामध्ये समावेश आहे. अ‍ॅपलचे apple मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी व्हर्चुअल कार्यक्रमाच्या माध्यमातून ही उत्पादने लाँच केली आहेत. कोरोना संकट असल्याने हा संपूर्ण सोहळा ऑनलाईन संपन्न झाला आहे. अ‍ॅपलने दोन नवीन अ‍ॅपल वॉच लाँच केले आहेत. अ‍ॅपलकडून स्मार्टवॉचची सहावी सीरिज (Apple Watch 6 Series) लाँच करण्यात आली आहे. 

कोरोना काळातील आरोग्याचा विचार करता कंपनीनं स्मार्टवॉचच्या Smartwatch सहाव्या सीरिजमध्ये रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण मोजणारं फीचर दिलं आहे. यासोबतच ईसीजी, हार्ट रेट आणि अन्य सेन्सर देखील असणार असून ते अ‍ॅपल वॉच सीरिज 5 आणि सीरिज 4 सोबत असणार आहेत. कोरोनाच्या या संकटात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. रक्तातील ऑक्सिजन अवघ्या 15 सेकंदांत मोजण्याची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. त्यामुळेच अशाप्रकारचं वॉच हे अत्यंत उपयुक्त मानलं जात आहे. 

एलिवेशन ट्रेकिंगचा होणार फायदा

अ‍ॅपल वॉच सीरिज 6 मध्ये एलिवेशन ट्रेकिंग देण्यात आले आहे. एलिवेशन ट्रेकिंगमुळे युजरला तो किती उंचीवर आहे याची देखील माहिती मिळण्यास मदत होणार आहे. अ‍ॅपलच्या या सीरिजमध्ये नवीन वॉच फेस देण्यात आले आहेत. जे युजर्स त्यांच्या हिशोबाने कस्टमाइज करू शकतात. या सीरिजची किंमत 399 अमेरिकन डॉलरपासून सुरू होते. भारतात Apple Watch 6 Series (GPS) ची किंमत 40 हजार 900 रुपयांपासून सुरू होईल. तर Apple Watch Series 6 (GPS Cellular) 49 हजार 900 रुपयांनी सुरू होईल.

आयपॅड एअर (iPad Air) भारतात ऑक्टोबरमध्ये होणार उपलब्ध

Apple Watch SE (GPS) ची किंमत तुलनेनं कमी आहे. हे स्मार्टवॉच 29 हजार 900 रुपयांपासून उपलब्ध असेल. तर Apple Watch SE (GPS Cellular) ची किंमत 33 हजार 900 रुपयांपासून सुरू होईल. आयपॅड एअर (iPad Air) भारतात ऑक्टोबरमध्ये उपलब्ध होईल. आयपॅड एअरच्या वायफाय मॉडेलची किंमत 54 हजार 900 रुपयांपासून सुरू होईल. तर वाय-फाय प्लस सेल्युलर मॉडेलची किंमत 66 हजार 900 रुपयांपासून सुरू होईल. 64 जीबी आणि 256 जीबी अशा दोन पर्यायांमध्ये आयपॅड एअर उपलब्ध असेल.

iPad (8th generation) 

iPad (8th generation) मध्ये पेन्सिल आणि रेटिना डिस्प्लेची सुविधा देण्यात आली आहे. आयपॅडमध्ये A12 चिपसेटचा वापर करण्यात आला असून गेमिंगची आवड असणाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन याची निर्मिती करण्यात आली आहे. वाय-फाय मॉडेल, वाय-फाय अधिक सेल्युलर मॉडेल अशा विविध सुविधांसह आयपॅड उपलब्ध होईल. त्यात 32 जीबी आणि 128 जीबी असे पर्याय आहेत. त्यांची किंमत 29 हजार 900 रुपयांपासून 41 हजार 900 रुपयांपर्यंत असेल.