Main Featured

कोल्हापुरातील रुग्णालयात अग्नितांडव

Agnitandav-at-Kolhapur-Hospital


kolhapur
मुंबई-पुण्यानंतर कोरोनाचा विळखा कोल्हापुरात kolhapur अधिक घट्ट होत असल्यानं नागरिकांमध्ये आधीच भीती असताना आता आणखीन एक मोठं संकट ओढवलं. सीपीआर रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला भीषण आग लागली आहे. या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू असताना ही मोठी दुर्घटना घडली. पहाटेच्या सुमारास अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये धूर आणि लोळ उठले होते.

Advertise

सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला आग लागल्याची ही घटना सोमवारी पहाटे घडली. आगीची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. कोल्हापूरमधल्या kolhapur सीपीआर शासकीय रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला पहाटे आग लागली होती आता ही आग आटोक्यात आली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

या रुग्णालयात कोरोनाच्या संसर्गामुळे प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांवर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना आग लागली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पहाटे सीपीआर रुग्णालयात जाऊन घटनास्थळाची पहाणी केली. तर ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आधीच कोरोनाचं संकट आणि त्यात लागलेली आग यामुळे रुग्णांचा मनात भीतीचं वातावरण असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.