Main Featured

कोविड सेंटरमध्ये तरूणीवर ‘बाऊन्सर’कडून सलग 3 दिवस बलात्कार


                                             raped-by-bouncer-


भाईंदरमधील कोविड सेंटरमध्ये एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार (rape) केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिने हि गोष्ट आपल्या पतीला सांगितली. या तरुणीला तिचा पती घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित तरुणीच्या आईने आरोपी बाऊन्सर (Bouncer) विरोधात नवघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात हि घटना घडली आहे.

Must Read

1) इचलकरंजीकरांसाठी नगरपरिषदेकडून विशेष ॲप

2) SBI ग्राहकों को एक बड़ा झटका

3) धोकादायक अ‍ॅप्स Google Play Store वरुन हटवले, तुम्हीही करा Delete

4) Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ

5) सलग पाचव्या दिवशी कोरोनाचा कहर सुरूच


या प्रकरणी त्या बाऊन्सरला अटक सुद्धा करण्यात आली आहे. त्याला १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या मोठ्या बहिणीची प्रसुती दरम्यान प्रकृती खालावल्याने ती २६ मे रोजी दगावली होती. तिची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यांनतर तिच्या संपर्कात आलेल्या ७ जणांना भाईंदरमधील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. तेव्हा पीडित तरुणी आणि तिची भाची करोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्या दोघांना त्याच सेंटर मध्ये दाखल करण्यात आले.

पीडितेने सांगितले कि २ जून रोजी रात्री १० वाजता मुलीला दूध आणि गरम पाणी देण्याच्या बहाण्याने तो आला होता. तो आतमध्ये आल्यानंतर त्याने माझ्यावर बळजबरी केली. तसेच या बाबत कुणाला काही सांगितले तर ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली. त्यानंतर त्याने सलग २ दिवस माझ्यावर बलात्कार केला असा आरोप पीडीतेने केला आहे. तरुणी गरोदर राहिल्याने तिने याबाबत आपल्या पतिला सांगितले. आता तिचा पती घटस्फोट घेण्याचा विचार करत आहे अशी माहिती पीडितेच्या आईकडून देण्यात आली आहे.