Main Featured

लग्नाच्या 17 दिवसानंतर जन्माला आलं मुल DNA टेस्टमध्ये उघड झालं ‘गुपित’


  
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उन्नावमध्ये नोंदवलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी सांगितले आहे की पीडित महिलेने तिच्या वडिलांवर आणि भावावर खोटा आरोप केला होता. लग्नाच्या 17 दिवसानंतर आई बनलेल्या या (DNA test reveals 'secret')महिलेने आपला गुन्हा लपविण्यासाठी बलात्कार आणि वेश्याव्यवसायात ढकलून दिल्याचा वडिलांवर आणि भावावर खोटा आरोप केला होता. एवढेच नव्हे तर डीएनए चाचणीत असेही आढळले आहे की मूल तिच्या प्रियकराचे आहे. प्रियकर दिलीपच्या सल्ल्यावरच आरोपीने कुटुंबियांना खोट्या प्रकरणात फसवले होते अशी महिलेने कबुली दिली आहे.

वास्तविक, संपूर्ण प्रकरण 29 डिसेंबर 2019 चे आहे, जेव्हा लखनौमधील बंथरा येथील रहिवासी असलेल्या एका महिलेने तत्कालीन एसपी विक्रांतवीर यांच्या समोर तिच्या वडिलांवर आणि चुलतभावावर तीन वर्षांपासून बलात्कार करण्याचा आरोप केला होता. तसेच वेश्याव्यवसाय (Prostitution) करण्यास भाग पाडल्याचा आरोपही केला होता. यानंतर 7 महिन्यांच्या(DNA test reveals 'secret') गरोदरपणाची माहिती होताच तातडीने तिचे लग्न 19 एप्रिल 2019 रोजी उन्नावमधील सदर कोतवाली भागातील एका गावात करून देण्यात आले. लग्नाच्या 17 दिवसानंतर 6 मे रोजी प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर त्या महिलेला सासरच्यांना सत्य सांगावे लागले. यानंतर आरोप करणार्‍या महिलेस एका नर्सिंग होममध्ये दाखल केले गेले, जिथे त्या महिलेने एका मुलाला जन्म दिला.

Must Read

वडिलांसह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला


पीडितेच्या तक्रारीवरून एसपीने वडिलांसह 10 जणांवर गुन्हा दाखल केला होता. महिला पोलिस स्टेशनचे एसओ इंद्रपाल सिंह सेंगर यांनी मंगळवारी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, महिलेचे लग्नाच्या दोन वर्षांपूर्वी लखनौच्या बंथरा येथील रहिवासी असलेल्या दिलीप नावाच्या(DNA test reveals 'secret') युवकाशी अवैध संबंध होते. दरम्यान, जेव्हा ती गरोदर राहिली आणि कुटुंबीयांना याची माहिती मिळाली तेव्हा तिचे लग्न करून देण्यात आले. मुलाला जन्म दिल्यानंतर आपला गुन्हा लपविण्यासाठी त्या महिलेने वडिलांसह इतर लोकांवर प्रियकराच्या सांगण्यावरून खोटा खटला दाखल केला. डीएनए चौकशीत असेही समोर आले आहे की दिलीप हाच मुलाचा वडील आहे. आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक करुन तुरूंगात पाठविण्यात आले आहे.