कोविड (COVID-19) संकटामुळे यंदा मालमत्ताधारकांना कर मागणीची बिले वेळेवर मिळाली नाहीत. त्यामुळे बिले वेळेत भरण्यात अडचणी येत आहेत. परंतु तांत्रिक अडचणीमुळे बिलात सूट देत नसल्याचे सांगण्यात असल्याने त्या मिळकतधारकांवर अन्याय होणार आहे. परंतु कोविडची परिस्थितीची लक्षात घेऊन त्यांना घरफाळ्याच्या संयुक्त करात 1 टक्के रिबिट देण्यात यावा, अशी मागणी ताराराणी आघाडीचे पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे यांनी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी व मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात, जे मालमत्ताधारक प्रामाणिकपणे व वेळेत बिले भरतात त्यांना रिबेट देण्याची तरतूद आहे. परंतु सन 2020-21 मधील घरफाळा बिले चालूवर्षी कोविड संकटामुळे मालमत्ताधारकांना वेळेत मिळाली नाहीत. जे मालमत्ताधारक प्रामाणिकपणे कर भरतात त्यांना रिबेट दिला जातो. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे बिलामध्ये सवलत देणेत येत नाही, असे कर विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रामाणिक कर भरणार्‍या मालमत्ताधारकांवर अन्याय होत आहे. शासनाने कोविड कालावधीत वेगवेगळया सवलती दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने या सदंर्भात शासनाकडे प्रस्ताव दाखल करुन तांत्रिक अडचणी दूर करुन घेणे गरजेचे होते. परंतु तीन महिन्यामध्ये हा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला नाही. त्याची कारणमिमांसा करण्यासह प्रस्ताव शासनाकडे ताबडतोब पाठवून मालमत्ताधारकांना संयुक्त करात 1 टक्का रिबेट देणेत, असे मोरबाळे यांनी म्हटले आहे.