इचलकरंजी येथे पोलिस असल्याची बतावणी करुन तारदाळ (ता. हातकणंगले) येथे घरात घुसून दमदाटी व झडती घेणार्‍या दोन तोतया पोलिसांकडून शहापूर पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्तुल, मोटरसायकल असा 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त  केला. मोहन सुरेश पवार (वय 20 रा. साखरवाडी निपाणी), प्रकाश मारुती कुंभार (वय 40 रा. नाईंगलज ता. चिक्कोडी) अशी त्यांनी नांवे असून मोहन पवार याच्या विरोधात निपाणी पोलिसात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिस निरिक्षक प्रकाश निकम यांनी दिली.

Must Read

1) महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले

2) मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस photo

3) 'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत

4) 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर

5) आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना बैलगाडीने प्रवास करावा लागतो..

तारदाळ येथील गोपाळ पोवार यांच्या घरी 27 सप्टेंबर रोजी दोन अनोळखी इसम घुसले. त्यांनी कर्नाटक पोलिस असल्याची बतावणी करत घराची झडती घेण्यास सुरुवात केली. पोवार यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुक्की करत दमदाटी करण्यात आली. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी मोहन पवार व प्रकाश कुंभार अशी नांवे सांगितली. त्या दोघांना ताब्यात घेऊन शहापूर पोलिस ठाण्यात आणून कसून चौकशी करता ते दोघे तोतया असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडील मोटरसायकल क्रमांक एमएच 09 सीवाय 9745 ची झडती घेता मोटरसायकलच्या सीटखाली गावठी बनावटीचे पिस्तुल मिळून आले. मोटरसायकल व पिस्तुल पोलिसांनी जप्त केले असून त्यांनी आणखीन काही गुन्हे केले आहेत का याचा तपास केला जात आहे. यातील मोहन पवार याच्यावर निपाणी शहर पोलिस ठाण्यात तोतया पोलिस असलचा बहाणा करुन दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याच्या अनुषंगाने गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनि जी. के. खराडे, पोहेकॉ महेश कोरे, ज्ञानेश्‍वर बांगर, अमर पाटील, पोकॉ सुनिल बाईत, अमर कदम, अमित भोरे आदींनी केली.