Main Featured

Zydus Cadila कंपनीनं कोरोनाचं देशातील स्वस्त औषध केलं लॉन्च, जाणून घ्या किंमत
देशात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढत असून दिवसाला 60 हजारांहून रुग्ण वाढत आहे. बाधितांचा आकडा 23 लाखांच्या पार गेला असून रुग्णांना वाचवण्यासाठी विविध औषधांचा वापर केला जात आहे. तसेच विविध देश कोरोना लसीवर काम करत असून आता हिंदुस्थानमधील एका औषध निर्मिती कंपनीने एक चांगली बातमी दिली आहे. औषध निर्माती कंपनी ‘जायडस कॅडिला’ (Zydus Cadila) ने कोरोनावर वापरले जाणारे देशातील सर्वात स्वस्त औषध लॉन्च केले आहे.
कंपनीने कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचारासाठी वापरले जाणारे रेमडिसीवीर (Remdesivir) हे औषध ‘रेमडेक’ (Remdac) या नावाने लॉन्च केले आहे. रेमडेकच्या इंजेक्शनची 100 मिलीग्रामची बाटली 2,800 रुपयांना उपलब्ध होईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. तसेच हे औषध संपूर्ण देशातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांत पुरवण्यात येणार असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे कोरोना संक्रमित रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
Must Read

कोरोना लसीवर काम सुरू
दरम्यान, ‘जायडस कॅडिला’ (Zydus Cadila) ही कंपनी कोरोनावरील लस (Covid-19 Vaccine)बनवण्याचे काम वेगाने करत आहे. कंपनीने ‘जायकोव-डी’ नावाची लस तयार केली असून याची क्लिनिकल चाचणी दुसऱ्या टप्प्यात आहे. लवकरच याबाबतही खुशखबर मिळेल अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे.
कोरोनाचा कहर 
देशात कोरोनाचा कहर सुरू असून गेल्या 24 तासात 66 हजार 999 रूग्णांची नोंद झाली असून 942 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 16 लाख 95 हजार 982 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 6 लाख 53 हजार 622 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर मृतांची संख्या 47 हजार 33 वर पोहोचली आहे.