Main Featured

हिंदू देव-देवतांवर अश्लील टिप्पणी करणाऱ्या हिर खानला 24 तासात अटक

हिंदू देव-देवतांवर अश्लील टिप्पणी करणाऱ्या सना उर्फ हिर खानला अखेर अटक करण्यात आली आहे. प्रयागराजमधील खुल्दाबाद भागात राहणाऱ्या हिर खान हिने यूट्यूब अकाउंटवरून हिंदू धर्म, देव- देवतांवर हिरवे फुत्कार सोडले होते. यानंतर समस्त हिंदू संघटना आक्रमक झाल्या आणि तिच्या (Black Day 5 August)अटकेची मागणी करण्यात आली. अखेर पोलिसांनी 24 तासांच्या आत तिच्या मुसक्या आवळल्या.
हिर खान अशिक्षित असून ती आई आणि बहिणीसोबत राहते. अयोध्येत झालेल्या श्रीराम मंदिराच्या विरोधात तिने ‘ब्लॅक डे 5 ऑगस्ट(Black Day 5 August)नावाने युट्युब चॅनेल सुरू केले. याच चॅनेलवरून ती हिंदू धर्म, देव- देवतांविरोधात गरळ ओकत होती. स्वतःला इस्लामची रक्षक बोलणाऱ्या हिर खान हिने प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्याबाबत अश्लील टिप्पणी केली होती. यामुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात होता.
दरम्यान, वादग्रस्त व्हिडीओ अपलोड केल्यानंतर हिर खान पोलिसांच्या कारवाई पासून वाचण्यासाठी प्रयागराज येथील (Black Day 5 August)आपल्या नातेवाईकांकडे लपून बसली होती. पोलिसांनी 24 तासात तिचा शोध घेत तिला अटक केली, असे प्रयागराजचे एसएसपी अभिषेक दीक्षित यांनी दिली आहे.