Main Featured

अखेर वुहान प्रयोगशाळेने मौन सोडले; विषाणूबद्दल सांगितली 'ही' माहिती


Wuhan Lab (file photo)

करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. करोनाचा फैलाव चीनमधील वुहान येथील 'वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी'च्या प्रयोगशाळेतून झाल्याचा दावा करण्यात येतो. अमेरिकेनेही सातत्याने हा दावा केला आहे. वुहान येथील प्रयोगशाळेतून करोनाचा विषाणू तयार करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला होता. करोनाच्या मुद्यावर चीनवर मोठ्या (Corona's spread is claimed to have been caused by a laboratory) प्रमाणावर आरोप झाले. करोनाच्या संसर्गावर आता वुहान येथील प्रयोगशाळेच्या संचालक वांग येन ई यांनी मौन सोडले असून त्यांनी वुहान प्रयोगशाळेवरील आरोप फेटाळून लावले.

वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये विषाणूंवर संशोधन करण्यात येते. या संस्थेत जवळपास १५०० विषाणू असल्याचे बोलले जाते. वुहान येथील प्रयोगशाळेच्या संचालक वांग येन ई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अमेरिकेतील 'एनबीसी'च्या पत्रकाराला मुलाखत दिली असून करोना संसर्गाच्या तपासावर राजकारणाचा प्रभाव पडता कामा नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 'एनबीसी'च्या पत्रकाराने ७ ऑगस्ट रोजी चीनच्या वुहान विषाणू प्रयोगशाळा आणि त्या ठिकाणी असणाऱ्या बीसीएल४ या प्रयोगशाळेचा दौरा केला होता.

या विषाणू संशोधन संस्थेच्या उपसंचालक युआन झिमिंग यांनी सांगितले की, सार्स सारख्या न्यूमोनिआचे विषाणूचे नमुने ३० डिसेंबर आढळले होते. या विषाणूंचे नमुने आम्हाला एका रुग्णालयातून आले होते. आम्ही हीच गोष्ट आधीपासून सांगत असल्याचे (Corona's spread is claimed to have been caused by a laboratory) त्यांनी सांगितले. याआधी या प्रयोगशाळेत कोणीच करोना व्हायरसवर काम केले नसल्याचा दावा त्यांनी केला. या प्रयोगशाळेतून करोनाचा विषाणू फैलावला या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

Must Read
या दरम्यान, वुहान विषाणू प्रयोगशाळेतील संशोधक युआन ची मींग यांनी सांगितले की, आम्हाला चीन-अमेरिकेत तणाव नको आहे. हा तणाव जागतिक स्थिरता आणि प्रगतीसाठी चांगला नाही. आम्ही अमेरिकन वैज्ञानिकांकडून खूप काही शिकलो असल्याचे युआन यांनी सांगितले. वुहानच्या प्रयोगशाळेत दाखल होणारे एनबीसी हे पहिले परदेशी प्रसारमाध्यम ठरले आहे. या प्रयोगशाळेत जाण्याआधी एका सुरक्षा रक्षकाने संबंधित (Corona's spread is claimed to have been caused by a laboratory) वृत्तमाध्यमांच्या कर्मचाऱ्यांचे तापमान मोजले आणि वस्तू तपासणी केली. प्रयोगशाळेच्या फॅसिलिटी विभागात कर्मचाऱ्यांनी सामान्य कपडे आणि मास्क घातले होते. तर, प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ, संशोधकांनी प्रोटेक्टीव्ह सूट परिधान केले असल्याचे 'एनबीसी'ने सांगितले.