Main Featured

सरडा की पान; तुम्हीही कन्फ्युझ झालात ना? काय आहे या फोटोत नेमकं वाचा


सरडा की पान; तुम्हीही कन्फ्युझ झालात ना? काय आहे या फोटोत नेमकं वाचा
रंग बदलणारा सरडा (lizard) आपणा सर्वांना माहितीच आहे. सरडा ज्या ठिकाणी असतो त्याप्रमाणे आपला रंग बदलतो. स्वत:च्या बचावासाठी निसर्गाने त्याला दिलेली ही एक देणगीच आहे. जो माणसांसाठी म्हणजे एक चमत्कार आहे. अशाच एका सरड्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी आपल्या ट्विटरवर हा फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये सुकलेल्या पानांचा फोटो आहे. यामध्ये सरडा शोधण्याचं चॅलेंज दिलं आहे. यात खरा सरडा तर सापडत नाही मात्र हुबेहुब सरड्यासारख्या आकाराचं पान मात्र दिसलं. खरं तर ते सुकलेलं पान नसून तो खरा सरडा आहे. विश्वास बसत नाही ना?
रमेश पांडे यांनी सांगितलं, या सरड्याची शेपटी ही पानासारखी असते आणि हा सरडा अगदी बारीक अशा फांदीवरही बसू शकतो आणि आपला रंग बदलू शकतो.हा फोटो पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. असं पाहिलं तर हे एक पानच दिसतं आहे, असा सरडा कधीच पाहिला नाही, निसर्ग खूप अद्भूत आहे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
निसर्गातले अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी याआधी आपण पाहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पिवळे बेडुक, पिवळे कासवही दिसलं होतं. जे लोकांनी कधीच पाहिलं नव्हतं. कोरोनामुळे आधीच घाबरलेले लोक असे विचित्र प्राणी पाहूनही घाबरले होते. मात्र तज्ज्ञांनी असं काही पाहून घाबरण्याची गरज नसल्याचं सांगितलं. प्राण्यांमधील हा बदल याचा कोरोनाशी काहीही संबंध नाही. कोरोना लॉकडाऊनदरम्यान आधापासून अस्तित्वात असलेल्या मात्र आपण कधीच न पाहिलेल्या अशा बऱ्याच गोष्टींकडे आता आपलं लक्ष जातं आहे. त्यामुळे त्याबाबत नवल वाटणं आणि त्याचं कुतूहल वाटणं साहजिकच आहे.