Main Featured

शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा मोर्चा बारामतीतच का?


शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा मोर्चा बारामतीतच का?


 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दूधदरवाढीसाठी काढलेला मोर्चा हा बारामतीतच का काढला? या प्रश्नाचं उत्तर राजू शेट्टी  (Raju Shetty) यांनी दिलं आहे. राजू शेट्टी बारामतीत म्हणाले, यापूर्वी दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चा काढला.  यानंतर आता बारामतीत आम्ही मोर्चा काढतोय. यात बारामतीसारख्या ठिकाणी गुराढोरांसह मोर्चा काढता येतो. यावेळी आम्ही प्रांत कार्यालयावर मोर्चा काढल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं
बारामतीत जेव्हा आपण मोर्चा काढतो, उपोषण केले, तेव्हा स्थानिक पदाधिकारी म्हणून सुप्रिया सुळे यांनी नेहमीच स्वागत केले आहे. एवढंच नाही यापूर्वी देखील ऊसदरवाढीसाठी मी जेव्हा बारामतीत उपोषण केलं होतं, तेव्हा देखील सुप्रिया सुळे यांनी आपल्या तब्येतीची विचारपूस केली होती, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.

Must Read


एवढंच नाही तर केंद्र सरकारच्या धोरणामुळे दूध उत्पादकांना फटका बसला असल्याचंही यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितलं, यावरून राजू शेट्टी यांचा रोख हा राज्य सरकारपेक्षाही केंद्र सरकारकडे जास्त असल्याचं दिसून येत आहे.