Main Featured

सावधान! WHOने कोरोनाबाबत दिला नवा इशारा, धोका आणखी वाढण्याची शक्यता


सावधान! WHOने कोरोनाबाबत दिला नवा इशारा, धोका आणखी वाढण्याची शक्यताजगभरात कोरोनाचा (coronavirus) प्रसार सुरूच आहे. आतापर्यंत 1 कोटी 97 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, सात लाख 28 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकट्या अमेरिकेत सध्या 1 लाख 65 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर जागितक आरोग्य संघटना (WHO) लक्ष ठेवून आहे. आता WHOने कोरोनाबाबत नवा इशारा दिला आहे. WHOने असे सांगितले आहे की, कोरोना व्हायरस अजूनही फिरत आहे आणि आणखी लोकांनी या व्हायरसची लागण होऊ शकते.
WHOकोरोना प्रमुख डॉ. मारिया व्हॅन केरखॉव्ह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की कोरोना हा हंगामी विषाणू असल्याचे कोणतेही संकेत नाही. कोरोनाला रोखण्यासाठी त्यांनी लोकांना शक्य ते सर्व करण्याचा सल्ला दिले (जसे की सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क घालणे आणि गर्दी टाळणे).
फ्रान्समध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारफ्रान्सची राजधानी पॅरिसमधील कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे लक्षात घेता मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. याअंतर्गत, 11 वर्षांवरील सर्व लोकांना मास्क परिधान करून सार्वजनिक ठिकाणी जावे लागेल. एखादी व्यक्ती त्याचे उल्लंघन करीत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर 121 डॉलर म्हणजेच सुमारे 9000 रुपये दंड आकारला जाईल.
न्यूझीलंडमध्ये 100 दिवस एकही कोरोना रुग्ण नाहीन्यूजीलँडमध्ये (New Zealand) मार्च महिन्याच्या शेवटी लॉकडाऊन अत्यंत कडक केला होता. यातून संसर्ग नियंत्रणात आणणे शक्य झाले. त्यावेळी देशात केवळ 100 जणांना संसर्ग झाला होता. देशात रविवारी संक्रमणाची एकही नोंद आलेली नाही. गेल्या 100 दिवसात एकही रुग्ण संक्रमित झालेला नाही. गेल्या तीन महिन्यात या देशात कमी जणांना लागण झाली असून यातही आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असून त्यांना परदेशातून परतताना सीमेवरच क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात येत आहे.
भारतात टेस्टिंगवर दिले जात आहे भरभारतात कोरोनाला रोखण्यासाठी जास्तीत जास्त टेस्टिंग केल्या जात आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या काही आठवड्यात रोज 10 लाख टेस्ट करण्याचे लक्ष ठेवले आहेत. जेणेकरून भारतातील वाढत्या रुग्णांची संख्या कमी करता येईल. देशात सध्या 22 लाख 15 हजार 074 कोरोना रुग्ण आहेत. तर, 44 हजार 386 जणांचा मृत्यू झाला आहे.