Main Featured

'ही' लढाई आपण नक्की जिंकू; अजित पवारांचं महत्त्वाचं विधान


अजित पवार


 पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील करोना बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाबाबत समाधान व्यक्त करतानाच करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करणे, मृत्यूदर कमी ठेवणे, चाचण्यांची(Important statement of Ajit Pawar) संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे तसेच इतर आजार असणाऱ्या व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार आणि विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याच्या सूचना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिल्या. दरम्यान गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा (रक्तद्रव) थेरपी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार  (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी व्यक्त केला. 

विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील करनाबाबतच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महत्त्वाचं मार्गदर्शन (Important statement of Ajit Pawar)अजित पवार यांनी केलं. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे ही समाधानाची बाब आहे. मात्र करोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनाबरोबरच करोना बाधित रुग्णाला वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्यावी. तसेच करोना विषाणूची भिती घालविण्यासाठी तसेच याविषयी जनसामान्यांमध्ये सतर्कता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती होण्यासाठी छोट्या-छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.

करोना संसर्गातून गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होत आहे. शासनाने ही सर्वात मोठी सुविधा सुरू केली आहे, असे नमूद करताना प्लाझ्मा दान करण्याबाबत जनजागृती करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले. करोनाच्या संकटाशी आपण सर्व मिळून विविध माध्यमातून लढत आहोत. आपण ही लढाई नक्की जिंकू असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.
Must Read

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी क्षेत्रनिहाय करोना बाधित रुग्ण, नमुना तपासणी प्रयोगशाळा, आठवडानिहाय करोना बाधित रुग्ण व मृत्यूचा तपशील, करोनामुक्त झालेले रुग्ण, संपर्क व्यक्ती शोधणे, क्षेत्रनिहाय प्रतिबंधित क्षेत्र, अनुमानित कोरोना रुग्ण व नियोजित बेड उपलब्धता, रुग्णवाहिका उपलब्धता याबाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच जम्बो रुग्णालय उभारणीचे काम गतीने सुरू असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यात करोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. पुणे पालिका आयुक्त विक्रमकुमार व(Important statement of Ajit Pawar) पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात करोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य उपसंचालक संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, डॉ. दिलीप कदम यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.