Main Featured

आरोप सिद्ध करा अन्यथा गंभीर परिणाम होतील


suraj pancholi

 सुशांत सिंह राजपूतआत्महत्येप्रकरणात (Sushant Singh in Rajput suicide case) राजकारण तापत असताना बॉलिवूडमधीलही काही बड्या कलाकारांना टार्गेट केलं जात आहे. यात आता आदित्य पांचोलीचाचा मुलगा व अभिनेता सूरज पांचोलीचं (Suraj Pancholi) नाव समोर येत आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची माजी मॅनेजर दिशा सालियाननं आत्महत्या का केली असा प्रश्न उपस्थित होत असतानाच या प्रकरणात सूरज पांचोली देखील जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. या आरोपांमुळं वैतागलेल्या सूरजनं वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सूरज पांचोलीनं दिशा सलियान आणि सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी त्याचं नाव गोवण्यात येत असल्याचं त्यानं म्हटलं आहे. या प्रकरणात त्याचं नाव घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं बोलण्यात येतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया, यूट्यूबर्स यांच्यावर फेक न्यूज पसरवल्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या अफवांमुळं मला (Sushant Singh in Rajput suicide case) मानसिक त्रास होत आहे. जर हे आरोप खरे असतील त्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत, असं आवाहनही त्यानं केलं आहे. दरम्यान, १० ऑगस्ट रोजी त्यांन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, याबाबत जाहीररित्या बोलणं त्यानं टाळलं आहे.
Must Read


दरम्यान, नारायण राणेंनी(Narayan Rane)(Sushant Singh in Rajput suicide case)  पत्रकार परिषद घेऊन सुशांतसिंहच्या आत्महत्येवर राजकारण करण्यात येत असल्याचं म्हटलं होतं. तसंच, दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असल्याचाही त्यांनी दावा केला होता. तसंच, सूरज पांचोलीवरही त्यांनी आरोप केले होते. मात्र, सूरज पांचोलीनं हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.