Main Featured

मोठी बातमी! व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार, डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित


मोठी बातमी! व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार, डोनाल्ड ट्रम्प सुरक्षितअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (donald trump) यांच्यासंदर्भात एका मोठी बातमी आहे. ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरू असताना व्हाईट हाऊसबाहेर (white house) गाळीबार झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प (donald trump) यांनी या संदर्भात माहिती दिली. सध्या स्थिती नियंत्रणात असून डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे.
'व्हाईट हाऊसबाहेर (white house) गोळीबार झाला. मात्र स्थितीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात आलं. यासाठी मी गुप्तहेराचे आभार मानतो,' असंही डोनाल्ड ट्रम्प (donald trump) म्हणाले. सध्या ते सुरक्षित असल्याची मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गोळीबारादरम्यान तिथल्या सुरक्षा यंत्रणेनी चोख प्रत्युत्तर दिलं. यावेळी आरोपीला गोळी लागली असून तो सध्या जखमी आहे. आरोपीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे. या गोळीबारात एक अधिकरीही सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे.
2020 अखेरपर्यंत कोरोना वॅक्सीन येणार...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत 65 मिलियन लोकांची चाचणी करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं कोरोनाची चाचणी करणारा अमेरिका जगातला पहिला देश आहे. तर दुसऱ्या स्थानावर भारताचा क्रमांक लागतो. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जी लस लगणार आहे ती या वर्षाच्या अखेरपर्यंत बाजारात उपलब्ध होऊ शकेल असा ट्रम्प यांनी विश्वास व्यक्त केला.
चीनसोबत कोणताही करार किंवा तोडगा काढावा असं आता वाटत नाही. चीननं जे केलं ते योग्य नाही. चीनवर संपूर्ण जग नाराज आहे. चीनसोबत कोणता तोडगा काढला जावा असं मला वाटत नाही अशी कठोर भूमिका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडली.