बाप दारू प्यायचा आणि आई टोपली विणायची, सूतारकाम करून तरुण झाला IASप्रामाणिक लाकूड तोड्याची गोष्टीप्रमाणचं जिद्द आणि मेहनतीनं प्रयत्न करणाऱ्या तरुणानं IAS पर्यंतचा पल्ला गाठला आहे. कधी एकेकाळी परिस्थितीमुळे लाकूड कापणं आणि सूतारकाम करावं लागत होतं. अभ्यास करून हे काम करणाऱ्या एम शिवागुरू प्रभाकरन यांचा IAS पर्यंतचा संघर्ष कसा होता.तमिळनाडूमधील तंजावूर जिल्ह्यातील शिवागुरू प्रभाकरन यांच्या कुटुंबाची परिस्थिती खूप वाईट होती. बाप खूप दारू प्यायचा आणि आई-बाण बांबूने टोपली विणायच्या. त्यातून कसंबसं घर चालायचं. वडिलांच्या व्यसनायापायी असलेला पैसाही जात होता. त्यामुळे लहान वयात घराची जबाबदारी खांद्यावर पडली.
12 वीनंतर इंजिनियर होण्याचं स्वप्न होतं. पण शिक्षण सुटलं. त्यानंतर परिस्थितीमुळे त्यांच्याकडे लाकूड कापण्याचं आणि सूतारकाम करण्याची वेळ आली. 2 वर्ष मशीनं लाकूड कापण्याचं काम त्यांनी केलं. मोल मजुरी करून पैसे जमवले आणि त्यातून वेळ मिळेल तसा अभ्यास केला.गरिबीमुळे सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न अजूनही अपूर्ण होतं. दिवस रात्र कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी पैसे जमवले आणि त्यासोबत अभ्यासही केला. IIT मधून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि UPSCचा अभ्यास सुरू केला. पहिले तीन प्रयत्न अपयशी झाले तरीही हार न मानता चौथ्या प्रयत्नात अखेर 2017 मध्ये त्यांनी UPSCची परीक्षा दिली. या परीक्षेत 101 वा क्रमांक मिळावला