Main Featured

यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाने मागितली ५ लाखांची लाच


bribe : आरोपींना अटक करणार नाही, सहायक पोलीस निरीक्षकाने मागितली ५ लाखांची लाच (प्रातिनिधिक फोटो)दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी नारायणगाव पोलिस ठाण्याच्या सहायक निरीक्षक व कर्मचाऱ्याने पाच लाखांची लाच मगितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांवर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्जुन केशव घोडेपाटील (वय ३८) आणि कर्मचारी धर्मात्मा कारभारी हांडे (वय ३७ ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पुणे ग्रामीण मधील नारायनगाव पोलिस ठाण्यात अर्जुन घोडे पाटील हे सहायक निरीक्षक म्हणून नेमणुकीस आहेत. तक्रारदार यांच्या विरोधात नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करण्यासाठी मदत करतो. तसेच, इतर दोन आरोपींना अटक न करण्यासाठी हांडे व पाटील यांनी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी घोडेपाटील याने हांडे याच्या मार्फत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दत्तात्रय भापकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.