Main Featured

CM उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियाच्या दबावात, सुशीलकुमार मोदींचा आरोप


बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत Sushant Singh Rajput आत्महत्या प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. आता बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी Chief Minister Sushilkumar Modi  यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बॉलिवूड माफियांचा दबाव आहे, असा आरोप सुशील मोदी यांनी केला आहे.

'आता बिहारचा मुलगा सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्युच्या चौकशीसाठी आलेल्या बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांचे सहकार्य मिळत नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर कॉंग्रेसचा वरदहस्त असलेल्या बॉलिवूड माफियांचा दबाव आहे. त्यामुळे सुशांत प्रकरणात जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांना वाचवण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. काँग्रेस बिहारच्या जनतेला काँग्रेस काय तोंड दाखवेल?, असा आरोप सुशीलकुमार मोदींनी केलाय.

'नवोदित अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या कथित आत्महत्येमुळे कोट्यावधी बिहारी नागरिकांना धक्का बसला आहे आणि दुःखी आहेत. यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी सर्वपक्षाची मागणी आहे. बिहार सरकारने केवळ चौकशीचे आदेशच दिले नाहीत, तर सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलीय. आणि रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी करताना बिहार सरकारची बाजूही समजूनही घ्यावी अशी विनंती केली गेलीय, असं सुशीलकुमार मोदी म्हणाले.

सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्व प्रयत्न करेल. महाराष्ट्रात पूर्वीही बिहारच्या नागरिकांशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारी येत होत्या. पण आता महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्यांवर चालणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव सरकारेंच्या सरकारने मर्यादा ओलांडल्या आहेत. लॉकडाउनच्या काळातही महाराष्ट्रातून बिहारला येणाऱ्यासाठी निघालेल्या मजुरांना अडकाठी केली जात होती, असा आरोप सुशीलकुमार मोदींनी केलाय.