Main Featured

सुशांत प्रकरणात सर्वात मोठी घडामोड; 'ही' व्यक्ती होणार सरकारी साक्षीदार, रियाच्या अडचणी वाढणार

सुशांत प्रकरणात सर्वात मोठी घडामोड; 'ही' व्यक्ती होणार सरकारी साक्षीदार, रियाच्या अडचणी वाढणार

 बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा (sushant singh rajput suicide case) तपास सीबीआयच्या हाती गेल्यानंतर आता याप्रकरणी नव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती (rhea chakraborty ) हिच्याविरोधात संशयाचं धुकं निर्माण झालं असतानाच तिने विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखत देत जोरकसपणे आपली बाजू मांडली. मात्र आता पुन्हा एकदा रिया चक्रवर्ती हिच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सिद्धार्थ पिठानी याने याप्रकरणी सरकारी साक्षीदार बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सुशांतचा मित्र असलेल्या सिद्धार्थ पिठानी याची गेल्या काही दिवसांपासून सीबीआयने कसून चौकशी केली आहे. त्यानंतर आता सिद्धार्थ हा सरकारी साक्षीदार होऊन रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात बोलण्याची शक्यता आहे. कारण त्याने तशी इच्छा व्यक्त केली आहे. (sushant singh rajput suicide case)पिठानी हा माफीचा साक्षीदार झाल्यास रियाच्या अडचणी वाढू शकतात.

Must Read

'मी त्याला जबरदस्तीने बोलावलं नव्हतं', रियाने केला खुलासा
'आरोपांचं वादळ उठल्यानंतर रिया चक्रवर्ती हिने नुकतंच समोर येत प्रत्युत्तर दिलं आहे. 'सुशांतच्या आयुष्यावर आणि त्याच्या घरावर माझं कधीच नियंत्रण नव्हतं. त्याला जे वाटायचं ते तो करायचा. त्याच्या घरी राहायला गेल्यावर ना मी त्याचा स्टाफ बदलला, त्याचे मॅनेजर, कुक आणि बॉडीगार्डही त्याने ठेवले तेच होते. सुशांत आपल्या बहिणीकडेही राहायला गेला होता. तो स्वत:च परत आला होता मी त्याला जबरदस्ती बोलावलं नव्हतं,' असा खुलासा एका मुलाखतीदरम्यान रियाने केला आहे.
सुशांतचं शेवटचं फोनवर बोलणं कुणाशी झालं?
'जेव्हा मला सुशांतची गरज होती त्यावेळी त्याने मला घराबाहेर काढले. त्यामुळेच जेव्हा सुशांतने 9 तारखेला मेसेजमध्ये माझ्याबद्दल विचारले त्यावेळी त्याला रिप्लाय करण्याऐवजी मी त्याला ब्लॉक केले. त्यामुळे सुशांतने दुसऱ्या दिवशी माझा धाकटा भाऊ शौविकला फोन करून विचारले की तो ठीक आहे का? त्यावर त्याने तो ठीक असल्याचे सांगितले. सुशांतने दुसरा प्रश्न असा विचारला की रिया कशी आहे? यावर देखील शौविकने(sushant singh rajput suicide case)ती ठीक असल्याचे उत्तर दिले. यानंतर जेव्हा शौविकने त्याच्या तब्येतीविषयी विचारले तेव्हा सुशांतने फार काही उत्तर दिले नाही. माझ्या कुटुंबामध्ये सुशांतची झालेली ही शेवटची बातचीत होती. त्यानंतर चक्रवर्ती कुटुंबातील कुणाशीच त्याचे बोलणे झाले नाही,' असा दावा रियाने केला आहे.