Main Featured

VIDEO : सुशांतच्या बहिणीने हात जोडले, म्हणाली- सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे


VIDEO : सुशांतच्या बहिणीने हात जोडले, म्हणाली- सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे
सुशांत सिंह राजपूत केसमध्ये (Sushant Singh Rajput Case) सीबीआयने (CBI) आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. ही केस सीबीआयकडे सोपवण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या रियाने सर्वोच्च न्यायालयात याचा विरोध देखील केला. याप्रकरणातील सत्यता समोर आणली जावी अशी मागणी वारंवार सुशांतच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे. दरम्यान सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी कोण करणार- मुंबई पोलीस, बिहार पोलीस की सीबीआय, याबाबत आज देशाचे सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊ शकते. सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्ती (Shweta Singh Kriti) हिने एक व्हिडीओ पोस्ट करत पुन्हा एकदा #CBIforSSR ची मागणी केली आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणातील सर्व पक्ष लेखी युक्तिवाद सादर करतील. या प्रकरणाची चौकशी सीबीआय करेल की मुंबई पोलीस यावर न्यायालयाचा निर्णय येणे बाकी आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी सुशांतच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकार आणि रिया चक्रवर्तीने सीबीआयने नोंदवलेली एफआयआर मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. तर बिहार सरकार आणि सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी याला विरोध दर्शविला आहे.
दरम्यान याबाबत सुशांतची बहिण श्वेताने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने असे म्हटले आहे की, 'मी तुम्हाला एक विनंती करते की पुन्हा एकदा एकत्र या आणि या केससाठी सर्वांनी एकजूट होऊन सीबीआय चौकशीची मागणी करावी. आम्हाला सत्यता जाणून घ्यायचे आहे आणि हे सत्य जाणून घेण्याचा आमचा हक्क आहे. जर असे नाही झाले तर आम्ही सत्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आम्ही शांतीपूर्ण जीवन जगू शकणार नाही.'

सुशांतच्या बहिणीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान त्याच्या चाहत्यांकडून देखील वारंवार सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीआधी देखील श्वेताने ट्वीट करून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे, असे म्हटले होते.