Main Featured

मनसेचा आदित्य ठाकरेंना पाठिंबा


Sushant Singh Rajput: ‘ठाकरे घराण्यात कुणी असं करणार नाही’, मनसेचा आदित्य ठाकरेंना पाठिंबा
सुशांत सिंग राजपूत Sushant Singh Rajput प्रकरणात संशयाची सुई आदित्य ठाकरेंकडे वळविण्याचा प्रयत्न होत असतांनाच मनसेने आदित्य यांना पूर्ण पाठिंबा व्यक्त केलाय. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणी ठाकरे घराण्यातील व्यक्तीचा अशा प्रकारच्या घटनेत सहभाग असेल असं मला वाटत नाही असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. आता या प्रकरणी  चौकशी होत असल्याने त्यातून सत्य बाहेर येईल असंही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणी आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली असून राजकीय चिखलफेकही होत आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. ठाकरे कुटुंबावर जेव्हा संकट येतं तेव्हा सगळे मतभेद विसरून एकत्र असण्याचा संदेशच यातून दिल्याची चर्चा आहे.
दरम्यान, सीबीआय चौकशी व्हावी आणि सुशांतला न्याय मिळावा अशी मागणी सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने केली. तिने आपल्या सोशल मी़डियावर व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर आता अंकिता अंकिता लोखंडेनेही (ankita lokhande) अशी मागणी करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. अंकिताने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत #CBIforSSR ची मागणी केली आहे.
या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी सुशांतच्या कुटुंबीयांची इच्छा आहे.सुशांतच्या चाहत्यांकडून देखील वारंवार सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकार आणि रिया चक्रवर्तीने सीबीआयने नोंदवलेली एफआयआर मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. तर बिहार सरकार आणि सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी याला विरोध दर्शविला आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआय करेल की मुंबई पोलीस यावर न्यायालयाचा निर्णय येणे बाकी आहे.