Main Featured

‘सुशांतचा मृतदेह पाहायला शवागृहात गेले, ‘सॉरी बाबू’ म्हणाले व पायही धरले, पण…’, रियाने सांगितले कारण
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूचा तपास आता सीबीआय करत असून गेल्या 7 दिवसांपासून कसून चौकशी सुरू आहे. या दरम्यान अनेक गोष्टी समोर येत असून तपासाची सुई सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्याकडे वळली आहे. अशातच रियाने ‘आज तक’ला विशेष मुलाखत दिली आहे. यात तिने सुशांतचा मृतदेह पाहायला शवागृहात गेले होते आणि ‘सॉरी बाबू’ही म्हणाले होते अशी कबुली दिली आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती कूपर रुग्णालयातील शवागृहात गेली होती आणि सुशांतचा मृतदेह पाहून ‘सॉरी बाबू’ म्हणाली होती, असे समोर आले. यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच याबाबत मुलाखतीत रियाला प्रश्न विचारला असता तिने रुग्णालयात गेल्याचे मान्य केले. ‘हो, मला दोन मित्रांनी सांगितले की तू रुग्णालयात जाऊन किमान त्याचे पार्थिव तरी पाहून ये. त्याला पाहिल्यावरच तो आपल्यात नाही यावर तुझा विश्वास बसेल. त्यामुळे मी रुग्णालयात गेले. मात्र तिथे मला शवविच्छेदन झाल्यावर अंतिम संस्कारासाठी पार्थिव शरीर बाहेर आले जाईल तेव्हा पहा असे सांगण्यात आले. त्यावेळी मी मी फक्त काही सेकंदासाठी त्याला पाहिले आणि सॉरी म्हणाले व त्याचे पाय धरले’, असे रिया उत्तरादाखल म्हणाली.

Must Read


म्हणून ‘सॉरी बाबू’ म्हणाले…
हो, मी त्याला पाहून सॉरी बाबू म्हणाले. तुम्ही एखाद्याचा मृतदेह पाहून काय म्हणाल? असा प्रतिप्रश्न करत रिया म्हणाली की, मी सॉरी म्हणाले कारण तो माझ्यासमोर जिवंत नव्हता. जेव्हा आपण कोणाला जीवापाड प्रेम करतो आणि तो जिवंत नाही राहिला तर आपण सॉरीच म्हणतो. सॉरी आज तू आमच्यात नाही, असे म्हणता. पण माझ्या या विधानावर टीका करण्यात आली आणि त्याची खिल्ली उडवली गेली, अशी खंत रियाने व्यक्त केली.
तेव्हा सर्व कळाले
यादरम्यान रियाने सुशांतच्या मृत्यूबाबत कसे कळाले हे देखील सांगितले. जवळपास दुपारच्या 2 वाजता भावासोबत रूममध्ये बसलेली असतात माझ्या मित्राचा मला फोन आला. त्याने सुशांत गेल्याची अफवा पसरल्याचे सांगितले. सुशांतने समोर येऊन हे खरे नाही असे सांगावे असेही मित्र म्हणाला. कारण त्याला मी सुशांतच्या घरी नसल्याचे माहिती नव्हते. मात्र ही बातमी ऐकून मी सुन्न झाले.