Main Featured

'...तर लोक एकाच समाजाला दोष देतील', मोहरमच्या मिरवणुकींना सुप्रीम कोर्टाचा नकार


'...तर लोक एकाच समाजाला दोष देतील', मोहरमच्या मिरवणुकींना सुप्रीम कोर्टाचा नकार

 कोरोनाच्या संकटामुळे सध्या देशभर सगळ्याच कार्यक्रमांवर बंदी आहे. मोठ्या सभा, कार्यक्रम, मिरवणुकांवर बंदी(Supreme Court rejects Moharram processions) आहे. या पार्श्वभूमीवर मोहरमच्या मिरवणुकांना परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळून लावली. देशभर मिरवणुकींना परवानगी दिली जाऊ शकत नाही. अशी  परवानगी मिळाली तर कोरोना प्रसारासाठी लोक एकाच समाजाला दोषी धरतील असं मतही कोर्टाने व्यक्त केलंय.
शिया समाजाचे धर्मगुरु मौलना कल्बे जव्वाद यांनी देशातल्या विविध शहरांमध्ये मिरवणुकींना (Supreme Court rejects Moharram processions)परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचा सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्यासाठी त्यांनी जगन्नाथ रथयात्रेला दिलेल्या परवानगीचं उदाहरणही दिलं होतं. मात्र ती यात्री ही फक्त एका शहरासाठीच होती. देशभर मिरवणुका काढण्याचा प्रश्न नव्हता असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

Must Read

यानंतर फक्त लखनऊसाठी परवानगी द्या अशी मागणी मौलांनांनी केली होती. त्यावर कोर्टाने त्यांना अलाहाबाद हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला. चंद्र दर्शन झालं तर 29 किंवा 30 ऑगस्टपासून हे पर्व सुरु होणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येनं वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 75 हजार 760 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, एकाच दिवसात सर्वाधिक 1023 रुग्णांचा मृत्यू झाला. याआधी भारतात 22 ऑगस्ट रोजी सर्वाधिक(Supreme Court rejects Moharram processions) 69 हजार 878 रुग्णांची नोंद झाली आहे. पहिल्यांदाच देशातील कोरोना रुग्णांची संख्या 75 हजार पार झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 7 लाख 25 हजार 99 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 25 लाख 23 हजार 772 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, 60 हजार 472 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.