Main Featured

कॉलेजच्या मेरिट लिस्टमध्ये सनी लिओनी टॉपर


प्रवेशासाठी जाहीर करण्यात आलेल्या एका महाविद्यालयाच्या मेरिट लिस्टमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचं (sunny leone) नाव पहिल्या क्रमांकावर झळकलं आणि एकच चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर सध्या सनीच्या नावाची चर्चा रंगली असून, या मेरिट लिस्टबद्दल कळताच सनी लिओनीनं ट्विट करून उत्तर दिलं आहे.


कोलकाता येथील एका कॉलेजने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी जारी केलेल्या पहिल्या मेरीट लिस्टमध्ये चक्क बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचं (sunny leone) नाव टॉपर म्हणून घोषित केल्याचं समोर आलं आहे. कोलकात्याच्या आशुतोष कॉलेजमध्ये हा विचित्र प्रकार घडलाय. कॉलेजने बीए ऑनर्स (Honours,English) प्रवेशासाठी जारी केलेल्या यादीत सनी लिओनीचं नाव सर्वात वरती होतं. ही यादी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली होती.

Must Read

वेबसाइटवर (Website)जाहीर केलेल्या यादीमध्ये अर्जाचा क्रमांक आणि रोल नंबरही होता. या यादीमध्ये सनी लिओनीला 12 वीच्या बोर्ड परीक्षेत सर्व विषयांमध्ये ( बेस्ट ऑफ फोर ) १०० पैकी १०० गुण देण्यात आले होते. पण, हे कोणीतरी जाणूनबुजून केलं असल्याचं कॉलेजच्या प्रशासकीय अधिकाऱ्यानं सांगितलं.
मेरिट लिस्टची हे वृत्त सगळीकडे पसरल्यानंतर सनी लिओनीनं त्यावर ट्विट करून उत्तर दिलं. “पुढील सेमिस्टरमध्ये आपण सर्वजण कॉलेजमध्ये भेटू. आशा करते की तुम्ही सगळे माझ्या वर्गात असाल,” असं म्हणत सनीनं चाहत्यांना उत्तर दिलं.
मेरिट लिस्टमध्ये नाव येण्यामागे काय आहे सत्य?
सनी लिओनीचं नाव चुकून त्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर झळकल्याचं महाविद्यालय प्रशासनानं म्हटलं आहे. “हे खोडकर काम आहे, कोणीतरी जाणूनबुजून सनी लिओनीच्या नावाने चुकीचा अर्ज पाठवला. आम्ही संबंधित विभागाला चूक सुधारण्यास सांगितले असून, या घटनेची चौकशीही केली जाईल”, असं महाविद्यालयातील अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.