Main Featured

सांगली जिल्ह्यात ‘कोरोना’चा प्रसार नियंत्रणाबाहेर

sangli corona cases

sangli जिल्ह्यात गुरुवारी 527 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 302 व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात व महापालिका क्षेत्रात एका दिवशी एवढ्या संख्येने रुग्ण आढळल्याचा हा उच्चांक आहे. गुरुवारी सांगली जिल्ह्यातील 29 व कोल्हापूर जिल्ह्यातील 4 अशा एकूण 33 व्यक्तींचा मृत्यू झाला. एका दिवशी एवढ्या संख्येने मृत्यूचाही हा उच्चांक आहे. त्यामुळे सध्या तरी कोरोनाचा प्रसार प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र आहे. 


उपचाराखालील 477 व्यक्ती अतिदक्षता विभागात आहेत. गुरुवारी 289 व्यक्तींनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात गुरुवारअखेर एकूण पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 9 हजार 941 झाली आहे. त्यापैकी 6 हजार 48 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. सध्या 3 हजार 481 व्यक्ती उपचाराखाली आहेत.


Must Readत्यापैकी 477 व्यक्तींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यातील 387 व्यक्ती ऑक्सिजनवर, 70 व्यक्ती नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर, 15 व्यक्ती हायफ्लो नेझल ऑक्सिजनवर, 5 व्यक्ती इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर आहेत. गुरुवारअखेर एकूण मृत व्यक्तींची संख्या 412 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

सांगली (sangli) महापालिका क्षेत्रातील 302 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये सांगलीतील 198 व मिरजेतील 104 व्यक्तींचा समावेश आहे. वाळवा तालुक्यातील 69 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये इस्लामपूर येथील 23, आष्टा 9, कासेगाव 15, वाटेगाव 6, येडेनिपाणी 1, कामेरी 1, ऐतवडे खुर्द 2, बावची  8, दुधारी 2, बोरगाव 1, पेठ येथील 1 व्यक्तीचा समावेश आहे. 

शिराळा तालुक्यातील 9 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये करुंगली येथील 1, बिऊर 1, टाकवे 2, शिराळा 1, वाडीभागाई 2, खिरवडे 1, चिखलवाडी येथील 1 व्यक्तीचा समावेश आहे. कवठेमहांकाळ येथील 1, रांजणी 1, करोली टी 7, सराटी 1 आणि शिरढोण येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. 

तालुकानिहाय


आटपाडी-403,  जत-318,  कडेगाव-212, कवठेमहांकाळ-323, खानापूर-273, मिरज-926, पलूस-342, शिराळा-418, तासगाव-391, वाळवा-616.  महापालिका क्षेत्र-5719.