Main Featured

शिवसेना-राष्ट्रवादीत धुसफुस सुरू


राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना (shivsena)आणि राष्ट्रवादी (NCP)या दोन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये योग्य समन्वय असला तरी स्थानिक पातळीवर उभयतांमध्ये काही जिल्ह्य़ांमध्ये धुसफु स सुरू झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या मदतीवरून रायगडमध्ये या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपानंतर परभणी जिल्ह्य़ात तर राष्ट्रवादीवर मनमानीचा आरोप करीत शिवसेनेच्या खासदाराने राजीनाम्याचे अस्त्र उगारले.


रायगडमध्ये निसर्ग चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीवरून शिवसेना  (shivsena) आणि राष्ट्रवादीत संघर्ष झाला. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे या शिवसेनेच्या आमदारांना विश्वासात घेत नव्हत्या, असा आरोप शिवसेनेच्या वतीने झाला. मदत वाटपात पक्षीय राजकारण झाल्याची टीका झाली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर यातून आरोप-प्रत्यारोप झाले. 
हा वाद वाढू नये या उद्देशानेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांची बैठक झाली. खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यासह दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते उपस्थित होते. यात मदत वाटपात सर्वाना विश्वासात घेण्याची भूमिका दोन्ही पक्षांनी घेतली. हा वाद अजूनही मिटलेला नाही. कारण या बैठकीनंतरही शिवसेना व राष्ट्रवादीत अजूनही सख्य झालेले नाही.
परभणीत राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्याकडून डावलण्यात येत असल्याने संतप्त झालेले शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी राजीनामा अस्त्र उगारले. राजीनामापत्र त्यांनी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठविले. नेतृत्वाचे लक्ष वेधण्याकरिता ही खेळी के ल्याचे स्पष्टच दिसते. 
आपला संताप किं वा नाराजी ही शिवसेनेबद्दल नाही तर राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांच्या विरोधात असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. परभणी आणि शिवसेनेच्या खासदारांचे पक्षांतर हे जणू काही समीकरण. कारण शिवसेनेतून निवडून आलेल्या खासदारांनी नंतर पक्ष सोडल्याची उदाहरणे आहेत. यामुळे खासदार जाधव हेसुद्धा याच मार्गाने जाणार का, अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली. पण जाधव यांनी आधीच आपला राग शिवसेनेच्या विरोधात नाही हे स्पष्ट केले होते.

जिल्ह्य़ा-जिल्ह्य़ांत वितुष्ट

भाजपला सत्तेपासून रोखण्याकरिता शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे सरकार असले तरी सरकारवर  शिवसेना आणि राष्ट्रवादीचेच वर्चस्व. सरकारी पातळीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यात एकवाक्यता असली तरी जिल्ह्य़ाजिल्ह्य़ांमध्ये मात्र तेवढे सख्य नाही हे रायगड आणि परभणीतील वादातून स्पष्ट झाले.