Main Featured

जागतिक आरोग्य संघटनेच्या नादाला लागून करोना वाढला : संजय राऊत




“जागतिक आरोग्य संघटनेच्या नादाला लागूनच करोना वाढला आहे,” असं मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत  (MP Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यविषयक असलेल्या माहितीबद्दल कौतुक केलं होतं. एबीपी माझावर आयोजित ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात या विषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
Must Read
“जागतिक आरोग्य संघटनेच्या नादालाच लागून करोना वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेत इतूनतिथून गोळा केलेली लोकं आहेत. नुकतीच रशियाची लस आली. जागतिक आरोग्य संघटना त्यांच्या विरोधात बोलली. परंतु रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यांच्या मुलीला ती लस दिलीच,” असंही राऊत म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक झालं आहे. धारावीमध्येही आता करोनाची परिस्थितीत नियंत्रणात आहे. मुंबईतही करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तर त्यामुळे त्यांना याचं श्रेय दिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.