Main Featured

पार्थच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही; शरद पवारांनी फटकारले


sharad-pawar

सुशांतसिंह प्रकरणाची (Sushant Singh case) सीबीआय चौकशी करण्याची पार्थ पवार यांची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावली आहे. मी माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, असं सांगत शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारले आहे. तर आजोबांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास पार्थ यांनी नकार दिला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule)आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका बैठकी निमित्त आले होते. यावेळी मीडियाशी बोलताना पवारांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. पार्थचा अनुभव कमी आहे. तो प्रगल्भ नाही. त्यामुळे माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही, असं पवार म्हणाले. तसेच कुणाला सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करायची असेल तर आमचं काही म्हणणं नाही. कुणाला सीबीआय चौकशीची गरज वाटत असेल (Sushant Singh case)तर त्याला विरोध असण्याचं कारणही नाही. मात्र, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Must Read


पवारांनी केलं आश्चर्य व्यक्त

एखाद्याने आत्महत्या केली तर त्यावर दु:ख होते. पण या प्रकरणाची ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे, त्याचं आश्चर्य वाटतं, असं सांगतानाच या प्रकरणात कुणी कुणावर काय आरोप केले या खोलात जायचं नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वक्तव्यावर बोलण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला. मला काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी एक निवेदन देऊन सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. आपल्याला देशभरातून तरुणांचे फोन येत आहेत. खासकरून यूपी, बिहारमधून (Sushant Singh case)अधिक फोन येत असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी तरुणांची भावना आहे. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, असं पार्थ यांनी म्हटलं होतं.