Main Featured

महाविकास आघाडीत शिवसेनेची ताकद वाढली, मोठ्या मंत्र्याने बांधले शिवबंधनमहाविकास आघाडीत शिवसेनेची ताकद वाढली, मोठ्या मंत्र्याने बांधले शिवबंधन
एकीकडे भाजपमध्ये मेगाभरतीत दाखल झालेले राष्ट्रवादीचे नेते परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असताना शिवसेनेत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh)यांनी आता अधिकृतरित्या प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शंकरराव गडाख यांनी शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे गडाख  यांचा अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश झाला(Shiv Sena's strength increased) आहे. शंकरराव गडाख नेवासा विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडून आले होते.  यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
नगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघात शंकरराव गडाख यांनी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. निवडणूक जिंकल्यानंतर गडाख यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती.

Must Read

शंकरराव गडाख आणि मिलिंद नार्वेकर यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहे. त्यामुळे विधानसभेत गडाख यांनी निवडून येताच शिवसेनेत प्रवेश करावा असा(Shiv Sena's strength increased)  आग्रह नार्वेकर यांनी केला होता. त्यावेळी गडाख यांनीही सेनेला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले होते.
अखेर आज गडाख यांनी आपला शब्द राखत शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला आहे.नगर जिल्ह्यात गडाख कुटुंब हे राजकारणातील मात्तबर नेते आहेत. नगर शहरातील सेनेचे माजी मंत्री आणि उप नेते अनिल राठोड यांचे मागील आठवड्यात कोरोनामुळे निधन झाले.  त्यामुळे  जिल्ह्यात शिवसेनेची मोठी पोकळी निर्माण झाली आहे.