• About
  • Advertise with us
  • Privacy Policy
  • Contact
Smart Ichalkaranji

Main Featured

Smart Ichalkaranji

  • Home
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • _कोल्हापूर
  • राजकीय
  • इचलकरंजी
  • बिजनेस
  • _Share Market
  • _Case Study
  • _इन्शुरन्स
  • मनोरजन
  • क्राइम
  • तंत्रज्ञान
  • राशीभविष्य
  • इतर
  • _International
  • _दिनविशेष
  • _आरोग्य
  • _रिलेशनशिप
Homeबिजनेसशेअर बाजार ; सेन्सेक्स-निफ्टीची आगेकूच सुरूच राहणार?

शेअर बाजार ; सेन्सेक्स-निफ्टीची आगेकूच सुरूच राहणार?

Smart Ichalkaranji August 11, 2020

शेअर बाजारशेअर निर्देशांकांनी  stock index सलग तिसऱ्या दिवशी सकारात्मक कामगिरी केली आहे. सोमवारच्या सत्रात औषध निर्माण क्षेत्रातील शेअर्सच्या कामगिरीने सेन्सेक्स-निफ्टीला बळ मिळाले.फार्मा सेक्टरच्या कामगिरीने बाजारात तेजीचे वातावरण होते. दिवसअखेर निफ्टी ५६.१० अंकांनी वाढून ११,२७० अंकांवर बंद झाला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १४१.५१ अंकांनी वाढला व ३८,१८२.०८ वर थांबला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की कालच्या सत्रात १७२३ शेअर्सनी नफा कमावला, १६६ शेअर्स स्थिर राहिले तर ९९६ शेअर्सनी Shares घट अनुभवली. फार्मा, आयटी, एफएमसीजी, बँक आणि ऑटो क्षेत्रासह सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात स्थिरावले. बीएसई स्मॉलकॅप १.४७ टक्क्यांनी वाढला तर बीएसई मिडकॅप १.४२ टक्क्यांनी वधारला.

बहिष्काराचा डोस कामी आला; चीनला असा बसला झटका!करोनातील नुकसान भरून काढण्यासाठी अमेरिकेसह काही प्रमुख देशांनी आर्थिक पॅकेजबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे बाजारात खरेदीस पोषक वातावरण आहे, असे मत रेलिगेअर ब्रोकिंगचे विश्लेषक अजित मिश्रा यांनी सांगितले. ते म्हणाले की गुंतवणूकदार अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्ष ,कमॉडिटी बाजारातील घडामोडी यावर लक्ष ठेवून आहेत, असे त्यांनी सांगितले.

भीषण अर्थसंकट; 'या' अर्थतज्ज्ञाचे भाकीत सरकारची झोप उडवणार
भांडवली बाजारात खरेदी दिसून आल्याने सोमवारी रुपया सकारात्मक स्थितीत होता. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ७४.८९ वर स्थिरावला. सत्रात युरोपियन बाजारात खरेदी दिसून आल्याने सकारात्मक व्यापार झाला. एफटीएसई १०० ने ०.५३ टक्क्यांची वृद्धी घेतली तर एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.५६ टक्क्यांनी वाढले. आशियाई बाजारात आजच्या व्यापारी सत्रात नकारात्मक स्थिती दिसून आली. नॅसडॅकने ०.८७ टक्क्यांची घसरण, निक्केई २२५ ने ०.३९ टक्क्यांची घसरण अनु‌भवली. हँगसेंगनेही ०.६३ टक्क्यांची घसरण नोंदवली.


तिमाही निकाल :

आयपीसीए लॅबोरेटरीज : कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २४५ टक्क्यांची मजबूत वाढ दर्शवली. तसेच कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल ४२ टक्क्यांनी वाढला. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ७.२५ टक्क्यांनी वाढला आणि २,०९८ रुपयांवर बंद झाला.

कोचिन शिपयार्ड लिमिटेड: कंपनीने २०२१ या वर्षातील पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ६५ टक्क्यांची घट दर्शवली. तरीही कंपनीचे स्टॉक्स ३.६० टक्क्यांनी वाढले. शेअरने ३४३.८० रुपयांवर ट्रेड केला. कंपनीचा या काळातील महसूल ५५ टक्क्यांनी वाढला.

महिंद्रा अँड महिंद्रा: कंपनीच्या २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहितील ट्रॅक्टर बिझनेसमधील उत्पन्न चांगल्या स्थितीत झाले. सोमवारच्या सत्रात कंपनीचे स्टॉक्स ४.९० टक्क्यांनी वाढले व त्यांनी ६२९.९० रुपयांवर ट्रेड केला.

सिप्ला लिमिटेड: २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीने अपेक्षेपेक्षा मजबूत उत्पन्न झाल्याचे नोंदवले. कंपनीचा जून २०२० च्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा २६.६ टक्के झाला. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ९.४८ टक्क्यांनी वाढले आणि शेअर ७९७.७० रुपयांवर बंद झाला.

इमामी लिमिटेड: कंपनीचा २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहितील निव्वळ नफा १.१७ टक्क्यांनी वाढला. महसूल २५.७९ टक्क्यांनी घसरला. कंपनीचे स्टॉक्स २० टक्क्यांनी घसरले .

Tags
बिजनेस
Reactions
  • Facebook
  • Twitter
  • Google+
  • Newer

  • Older

You may like these posts

Share Market

smart gyaan

Sports News

Business Case Study

science

Literature

Follow Us

Entertainment

3/मनोरजन/post-list

Business

3/बिजनेस/post-list

Crime

3/क्राइम/post-list

राजकीय

3/राजकीय/post-list

तंत्रज्ञान

3/तंत्रज्ञान/post-list

Menu Footer Widget

  • Home
  • About
  • Advertise with us
  • Privacy Policy
  • Contact Us
Copyright © Smart Ichalkaranji
Powered by Blogger