Main Featured

शेअर बाजार ; या गोष्टी ठरवणार बाजाराची दिशा


शेअर बाजार
शेअर बाजारात stock markeगुरुवारी किरकोळ घसरण झाली. सुरुवातीच्या तासात बाजारात खरेदीचा ओघ होता. मात्र त्यानंतर बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आणि सेन्सेक्स आणि निफ्टीतील तेजीला ब्रेक लागला. गुरुवारी सेन्सेक्स ५९ अंकांनी घसरला आणि ३८३१० अंकांवर बंद झाला. निफ्टी ७ अंकांनी घसरून ११३३०० अंकांवर स्थिरावला.

भांडवली बाजाराच्या तुलनेत सध्या कमॉडिटी बाजारात मोठी उलथापालथ सुरु आहे. नुकताच रशियाने करोनावर लस विकसित केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे जगभरात आशेचा किरण निर्माण झाला आहे. दरम्यान, मागील चार सत्रात बाजारातील तेजी कमी होत गेली असली तरी नजिकच्या काळात तो पुन्हा उसळी घेईल, असा विश्वास रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी व्यक्त केला. मात्र सर्वोच्च न्यायालयात आज होणाऱ्या AGR संदर्भातील सुनावणीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल, असे त्यांनी सांगितले.

चांदी तेजीत- सोने स्वस्त ; जाणून घ्या आजचा भावभारतात करोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे त्याचे पडसाद बाजार मूल्यावर उमटले असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी सांगितले. मार्केट सध्या वेट अँड वॉच मूड मध्ये असून गुंतवणूकदारानी सावधपणे गुंतवणूक करावी, असा सल्ला नायर यांनी यावेळी दिला.

निफ्टीने ११२०० चा स्तर राखला आहे. जर त्यात वाढ झाली तर तो ११४०० ते ११५०० पर्यंत मजल मारेल, असा अंदाज मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीजचे शेअर बाजार विश्लेषक चंदन तपारिया यांनी व्यक्त केला. गुरुवारी अमेरिका आणि युरोपातील शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते.

सेन्सेक्सची दमदार कामगिरी ; लाॅकडाउनमध्ये गुंतवणूकदार मालामालजुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर ६.९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. ग्राहक किंमत निर्देशांक बाजाराच्या अपेक्षेपेक्षा वरच्या पातळीवर गेला आहे. खाद्यपदार्थांची महागाई वाढल्याने ग्राहक किंमत निर्देशांक रिझर्व्ह बँकेच्या निर्धारित दरापेक्षा वर राहिला आहे. देशव्यापी लॉकडाउनच्या काळात खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. त्याचाच परिणाम महागाईचा दर वाढण्यावर झाला आहे. सध्या लॉकडाउन शिथिल करण्यात आला असून, चांगल्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात महागाईचा दर नियंत्रणात येण्याची शक्यता आहे, असे मत एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसचे करन्सी रिसर्च विभागाचे प्रमुख राहुल गुप्ता यांनी व्यक्त केले.

कर प्रणाली पारदर्शक करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन महत्वाच्या सुविधांची घोषणा केली. फेसलेस असेसमेंट , फेसलेस अपील आणि टॅक्सपेअर चार्टर या सुविधांची पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली. यातील फेसलेस असेसमेंट , फेसलेस अपील या दोन सुविधा तात्काळ लागू झाल्या असून टॅक्सपेअर चार्टरची २५ सप्टेंबरपासून अंलबजावणी होणार आहे.