Main Featured

बँकेने लाँच केले खास बचत खाते मिळेल corona insurance with Cashback


खाजगी क्षेत्रातील मोठी बँक असणाऱ्या अ‍ॅक्सिस बँकेने (Axis Bank) ग्राहकांची सुविधा लक्षात घेता एक नवीन बचत खाते लाँच केले आहे. विशेष म्हणजे हे खाते उघडल्यानंतर ग्राहकांना वार्षिक 20 हजार रुपयांचा इन्शूरन्स मिळेल. जो कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे होणारा खर्च देखील कव्हर करेल. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बँक ही सुविधा देत आहे. अशाप्रकारचे हे पहिले बचत खाते आहे, जे महामारीसाठी कव्हर देते. बँकेच्या या योजनेचे नाव 'लिबर्टी सेव्हिंग्स अकाउंट' (Liberty Savings Account) असे आहे.


या खात्यामध्ये ग्राहक 25 हजार रुपये प्रति महिना कमीत कमी बॅलेन्स ठेवण्याची किंवा गरजेनुसार प्रत्येक महिन्याला 25000 रुपये लिबर्टी डेबिट कार्ड किंवा बचत खात्यातून (नेटबैंकिंग, Axis Mobile किंवा UPIच्या माध्यमातून) खर्च करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

Must Read


लिबर्टी सेव्हिंग अकाउंटमध्ये ग्राहक प्रत्येक विकेंडला (शनिवारी आणि रविवारी) फूड, मनोरंजन, खरेदी आणि ट्रॅव्हलिंगवर करण्यात येणाऱ्या खर्चावर 5 टक्के कॅशबॅकचा फायदा मिळेल. याशिवाय ग्राहकाच्या बर्थडे मंथमध्ये वेगळी ऑफर देण्यात येईल. पॅकेजच्या या भागामध्ये 15 हजार रुपयांचे वार्षिंक बेनिफिट्स मिळतील. हे बेनिफिट्स ग्राहकांना कॅशबॅक, बँकिंग, डायनिंग आणि तिमाही नुसार केलेल्या खर्चावर वाउचरच्या रुपात मिळतील. हे प्रोडक्ट तरुण ग्राहकांना लक्षात ठेवून बनवण्यात आले आहे

Axis Bank कडून अशाप्रकारे विविध स्कीम त्यांच्या ग्राहकांसाठी सुरू केल्या आहेत. कोरोनाच्या संकटात लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बँकेने 'गिग-अ-ऑपरच्यूनिटीज'चा उपक्रम सुरू केला आहे. या मॉडेल अंतर्गत कोणताही प्रतिभावान उमेदवार देशातील कोणत्याही भागात बँकेबरोबर काम करू शकतात.