Main Featured

साराही झाली ट्रोल; ‘प्लीज मला काम द्या..’ Video Viral
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh rajput) याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिजमवर जोरदार चर्चा सुरू आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह राजपूत याची केस CBI कडे सोपविण्याचा निर्णय घेतला. हे मोठं यश असल्याची भावना त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान सोशल मीडियावर सारा अली खान (Sara Ali Khan)आणि रोहीत शेट्टीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Must Read

Must Read 1) शेअर बाजारात तेजी; निर्देशांकात वाढ 2) संजय दत्तच्या आजाराबाबत मान्यताचा आणखी एक खुलासा 3) सारा- कार्तिकने एकमेकांना केले ‘अनफॉलो’...! हे कपल्सही याचमुळे आले होते चर्चेत 4) भरदिवसा व्यावसायिकाला जिवंत जाळलं; 90 टक्के भाजलं शरीर, अंगावर शहारे आणणारा VIDEO

 nepo kids वर टीका

गेल्या अनेक दिवसांपासून नेपोटिजमच्या मुद्द्यावरुन अनेक स्टारकिड्सनां ट्रोल केलं जात आहे. सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा, करिना कपूर, करन जोहर, जान्हवी कपूर यांच्यासह अनेकांना nepo kids म्हणत त्यांच्यावर टीका केली जात आहे. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर बॉलिवूड माफिया आणि नेपोटिजमवर मोठी चर्चा सुरू आहे.

रोहीत शेट्टीच्या व्हायरल व्हिडीओ हा कपिल शर्मा याच्या कॉमेडी शोमधला असून 'सिम्बा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सारा अली खान, रणवीर सिंह (Ranveer singh)आणि रोहित शेट्टी येथे उपस्थित होते. यावेळी रोहित शेट्टीने सारा अली खानबद्दलचा एका किस्सा शेअर केला. त्याने सांगितले की, सैफ अली खान याची मुलगी सारा एकदा माझ्या ऑफिसात आली होती.


आणि हात जोडून मला काम द्या, अशी विनंती केली होती. साराला त्या परिस्थितीत बघून मला रडू आल्याचं रोहितने सांगितले. ट्रोलर्सनी हा व्हिडीओ खूप ट्रोल केला आहे. अनेक युजर्सने काम मिळविण्यासाठी रोहित शेट्टीकडे जाण्याचा सल्ला दिला आहे.
यानंतर सारा अली खानचाही (Sara Ali Khan) एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये तिने स्टार किड असल्याचा अभिनय क्षेत्रात फायदा होत असल्याचे मान्य केले आहे.