Main Featured

सुशांतच्या वडिलांबद्दल केलेल्या दाव्यावर संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले...


सुशांतच्या वडिलांबद्दल केलेल्या दाव्यावर संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले...

भिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली खरी पण केलेल्या दाव्यामुळे वाद पेटला होता.  त्यामुळे संजय राऊत यांनी आता 'आमची काही चूक झाली तर मी माफी (Actor Sushant Singh Rajput case) मागेल', अशी भूमिकाच स्पष्ट केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरामध्ये संजय राऊत यांनी सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांबद्दल अजब दावा केला होता. त्यानंतर राजपूत कुटुंबीयांनी त्यांचा दावा खोडून काढला होता. एवढंच नाहीतर संजय राऊत यांना नोटीसही बजावण्यात आली होती.
आज पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की, 'आम्हाला 50/200 नोटीस येत राहतात. मला सुशांतच्या कुटुंबीयांची काय मागणी आहे, ते माहिती नाही. मी संवेदनशील व्यक्ती आहे. मला जर वाटलं की, आमची काही चूक झाली तर मी माफी मागेल. मी माझ्या माहितीच्या आधारे(Actor Sushant Singh Rajput case)  बोललो आहे. त्यांचा परिवार त्यांच्या माहितीच्या आधारे बिहारमधून आरोप करत आहे.'
Must Read
तसंच,  'सुशांत प्रकरणाचा तपास करण्यात मुंबई पोलीस सक्षम आहेत, तेच हे हा तपास करतील. मुंबई पोलिसांना अस्वस्थ करुन, त्यांच्यावर दबाव आणून कोणाला काही लपवण्याची दुर्बुद्धी सुचली असेल तर ईश्वर त्यांना चांगली बुद्धी देवो' असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.
'सुशांत प्रकरणातून महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचं काम काही जण करत आहे. येत्या काही काळात या प्रकरणामागे  कोण त्यांची नाव लवकरच सांगू', असा इशाराही राऊत यांनी दिली.
त्याचबरोबर त्यांनी राजस्थानमध्ये ऑपरेशन कमळ फेल झाल्यावर भाष्य केले आहे. 'राजस्थानचा संबंध महाराष्ट्राशी लावू नका, महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात पाऊस पडतोय त्यात सगळं हे वाहून गेलं आहे. विरोधकांचा आत्मानंद आहे. राज्यापुढे खूप प्रश्न आहेत. त्यात हे सरकार पाडणं, अस्थिर करणं यात त्यांना रस आहे. त्यांनी जनतेच्या दुःखावर पोळ्या शेकत राहावं' असा(Actor Sushant Singh Rajput case)  पलटवार राऊत यांनी भाजपवर केला.
काय म्हणाले होते राऊत?
'सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते.  सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले.'
सुशांतच्या मामाने खोडला राऊतांचा दावा
सुशांतच्या मामाने संजय राऊतांचा हा दावा खोडून काढला होता. 'खासदार संजय राऊत यांनी आमच्या कुटुंबीयावर चुकीचे आरोप केले आहे. त्यांचे हे वक्तव्य प्रतिमा मलिन करणार आहे. कोणतीही माहिती न घेता उगाच आरोप करून एखाद्याच्या प्रतिमेवर बोट ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?' असा सवाल सिंग यांनी थेट राऊतांना विचारला.
तसंच, सुशांत आणि त्याच्या वडिलांमध्ये पटत नसले तरीही त्याच्या वडिलांनी कोणतेही दुसरे लग्न केले नाही. हे बिहारमध्ये(Actor Sushant Singh Rajput case)  राहत असणाऱ्या सर्व लोकांना माहिती आहे, असा खुलासाही सिंग यांनी केला. तर दुसरीकडे सुशांतचे चुलत भाऊ आणि बिहार भाजपचे आमदार नीरज सिंह बब्लू यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.