Main Featured

तर सुशांतसिंहच्या कुटुंबीयांची माफीही मागेन; राऊत बॅकफूटवर


sanjay-raut

सुशांतच्या कुटुंबीयांनी नोटीस पाठवल्याचं मला माहीत नाही. आम्हाला रोज शे-पाचशे नोटीस येतात. नोटीस आली की नाही बघावे लागेल. हा सुशांतच्या कुटुंबीयातील आणि माझ्यातील प्रश्न आहे. मी संवेदनशील माणूस आहे. याप्रकरणात चुकीचं काही बोललो असेल तर त्यांच्या कुटुंबीयांशी जरूर बोलेल, असं सांगतानाच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सुशांतसिंह प्रकरणी केलेल्या लिखाणावरून माफी मागण्याची तयारी दर्शवली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी दैनिक सामनातील स्तंभातून सुशांतसिंहच्या कुटुंबातील खासगी बाबींवर प्रकाश टाकला होता. त्याच्या वडिलाने दुसरं लग्न केलं होतं. त्यामुळे सुशांत नाराज होता. वडिलांशी त्याचं जमत नव्हतं, असं राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर सुशांतच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. सुशांतचा चुलत भाऊ नीरज सिंह याने राऊत यांना आज नोटीस पाठवली होती. राऊत यांनी ४८ तासात माफी मागावी अथवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, असा इशारा या नोटीशीतून राऊत यांना देण्यात आला होता. त्यावर राऊत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

सुशांतच्या कुटुंबीयांनी नोटीस पाठवल्याचं मला माहीत नाही. आम्हाला रोज शे-पाचशे नोटीस येतात. नोटीस आली की नाही बघावे लागेल. मला बरीच कामे आहेत, असं सांगतानाच बिहारमध्ये बसून जशी त्यांच्या कुटुंबीयांना काही एक माहिती मिळते आणि ते बोलतात, तशी मलाही माहिती मिळाली त्याआधारावर मी  (Shiv Sena leader Sanjay Raut) बोललो. हा सुशांतच्या कुटुंबीयातील आणि माझ्यातील प्रश्न आहे. मी संवेदनशील माणूस आहे. या प्रकरणात चुकीचं काही बोललो असेल तर त्यांच्या कुटुंबीयांशी जरूर बोलेल. याप्रकरणात मीडियाने पडण्याची गरज नाही, असं राऊत म्हणाले.
Must Read


दरम्यान, सुशांत प्रकरणाचं राजकारण न करण्याचं आवाहनही त्यांनी विरोधकांना केलं. सुशांत प्रकरणावर कुणीही राजकारण करू नये. काही लोक सरकार पडण्याच्या डेडलाइन देत आहेत. त्याला आत्मानंद म्हणतात, अशी टीकाही त्यांनी केली.


जून महिन्याच्या १४ तारखेला सुशांतनं त्याच्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूला जवळपास दोन महिने उलटल्यानंतरही त्यावरून चर्चा, वाद आणि आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. राज्यातील विरोधी  (Shiv Sena leader Sanjay Raut) पक्षाने सीबीआय चौकशीची मागणी लावून धरल्याने व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव यात अप्रत्यक्षरित्या घेतलं जात असल्यानं या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. शिवसेनेनेही तातडीनं पुढं येत सर्व आरोप फेटाळले आहेत.