Main Featured

सॅमसंगच्या नवीन फोल्डेबल फोन ‘या’ तारखेला होणार लाँच


दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीने (Samsung)या महिन्याच्या सुरूवातीला ‘गॅलेक्सी Unpacked इव्हेंट’मध्ये अनेक शानदार प्रोडक्ट्स लाँच केले. यावेळी कंपनीने Galaxy Note 20 सीरिज, गॅलेक्सी Watch 3, गॅलेक्सी Buds Live इअरफोन्स आणि गॅलेक्सी Tab S7 सीरिज आणली आणि यासोबतच कंपनीने नेक्स्ट-जनरेशन फोल्डेबल फोन Galaxy Z Fold 2 सादर केला. 


आता हा नवीन Galaxy Z Fold 2  लवकरच लाँच होणार आहे. सॅमसंगने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन गॅलेक्सी Z फोल्ड 2 स्मार्टफोन एक सप्टेंबर रोजी Unpacked Part 2 इव्हेंटमध्ये लाँच केला जाईल, अशी माहिती दिली आहे. हा इव्हेंट सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर असेल.


Must ReadGalaxy Z Fold 2 कोणते फीचर्स असतील?:-

Unpacked Part 2 इव्हेंटमध्ये नवीन फोल्डेबल फोनच्या सर्व स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबाबत कंपनीकडून माहिती दिली जाईल. पण त्याआधीच या फोनचे काही फीचर्स लीक झाले आहेत. त्यानुसार, Galaxy Z Fold 2 स्मार्टफोनमध्ये नावाप्रममाणे दोन डिस्प्ले असतील. फोन फोल्ड झाल्यानंतर 6.2 इंचाची एक्स्टर्नल फुल साइज स्क्रीन मिळेल. 
तर, अनफोल्ड असताना फोनचा मुख्य डिस्प्ले 7.6 इंचाचा असेल. उत्तम इमेज क्वालिटीसाठी यावेळी कंपनीने अल्ट्रा-थिन ग्लासचा वापर केला आहे. फोनचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि इंटर्नल कॅमेरा पंच-होल डिझाइनमध्ये दिला आहे. 5जी कनेक्टिव्हिटीच्या सपोर्टसह हा फोन mystick black आणि mystic bronze अशा दोन कलरच्या पर्यायांमध्ये येईल. फोनच्या मागील बाजूला ट्रिपल रिअर कॅमेरा (12MP + 12MP + 12MP) सेटअप मिळेल. तर, फोनच्या बाहेर आणि आत 10-10 मेगापिक्सलचे फ्रंट कॅमेरे आहेत. या फोनमध्ये 4,500mAh क्षमतेची बॅटरीसोबतच लेटेस्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 Plus प्रोसेसर मिळेल.

किंमत किती असणार? :-

Galaxy Z Fold 2 हा फोन म्हणजे गेल्या वर्षी लाँच झालेल्या Galaxy Z Flip ची पुढील आवृत्ती आहे. सोशल मीडियामध्ये या फोनच्या किंमतही लीक झाली आहे. त्यानुसार जर्मनीत या फोनची किंमत 1999 युरो (जवळपास 1,74,000 रुपये) असू शकते. फोनमध्ये नवीन कॅमेरा सिस्टिम, मोठा एक्स्टर्नल डिस्प्ले व त्यामध्ये पंचहोल कॅमेरा आहे. एक सप्टेंबरपासून या फोनसाठी प्री-ऑर्डर्स सुरू होणार आहेत. त्याचवेळी फोनच्या किंमतीचा आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला जाणार आहे.