Main Featured

दमदार बॅटरीसह सॅमसंगचा बहुप्रतिक्षित ‘Galaxy M51’ फोन सप्टेंबरमध्ये होणार लॉन्च, किंमत किती?
सॅमसंग  (Samsung) कंपनीने आपल्या बहुप्रतिक्षित Galaxy M51 स्मार्टफोनचा टीझर लॉन्च केला आहे. अमेझॉन इंडियाने (Amazon india) या स्मार्टफोनचा टीझर लॉन्च केला असून याचे फीचर्स जबरदस्त आहेत. स्मार्टफोनमध्ये 7,000 mAh दमदार बॅटरी देण्यात येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सॅमसंग हा स्मार्टफोन सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लॉन्च करण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनच्या पंचहोल डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच दमादर बॅटरी देण्यात आली असून कंपनी यासोबत रिव्हर्स चार्जिंग फीचर देण्याची शक्यता आहे.

Must Read

कंपनीने जारी केलेल्या व्हिडीओत स्मार्टफोनला 4 रियर कॅमेरे देण्यात आल्याचे दिसते. तसेच फिंगरप्रिंट स्कॅनर आणि एलईडी फ्लॅश मॉड्युल देखील देण्यात आले आहे. बाजारात फोन लॉन्च होताच यावर ग्राहकांच्या उड्या पडतील अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. स्मार्टफोनला Qualcomm Snadpragon 730 प्रोसेसर देण्यात येईल अशी शक्यता आहे.