Main Featured

‘या’ कारणासाठी सलमान पनवेलहून मुंबईला परतला?
गेल्या काही महिन्यांपासून पनवेल इथल्या फार्महाऊसवर मुक्कामाला असलेला अभिनेता सलमान खान (Salman Khan)आता पुन्हा मुंबईतील वांद्रे इथल्या घरी परतला आहे. सलमान लॉकडाउन जाहीर झाल्यापासून पनवेल इथल्या फार्महाऊसवर राहत होता. त्याच्यासोबत त्याचे काही कुटुंबीय व सहकलाकारसुद्धा राहत होते. या फार्महाऊसवरचे अनेक फोटो व व्हिडीओ सलमानने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आता जवळपास चार-पाच महिन्यांनंतर तो मुंबईतला परतल्याचं कळतंय.


Must Read


पनवेलमधल्या फार्महाऊसवर सलमान (Salman Khan) त्याच्या आगामी चित्रपटांवर काम करत होता. यादरम्यान त्याने दोन म्युझिक व्हिडीओसुद्धा प्रदर्शित केले. हे दोन्ही म्युझिक व्हिडीओ फार्महाऊसवरच शूट करण्यात आले होते. आता सलमान ‘बिग बॉस’च्या आगामी सिझनच्या शूटिंगनिमित्त मुंबईला परतल्याचं समजतंय.
‘बिग बॉस’च्या चौदाव्या सिझनचा प्रोमो प्रदर्शित झाला असून लवकरच त्यात कोणकोणते स्पर्धक सहभागी होतील यावरून पडदा उचलण्यात येणार आहे. येत्या सप्टेंबरमध्ये हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सलमान त्याच्या तयारी करत आहे. या रिअॅलिटी शोचा प्रोमो सलमानने पनवेलमधल्या फार्महाऊसमध्येच शूट केला होता.