Main Featured

धनु राशी भविष्य Sagittarius Horoscope


  
मानसिक भीतीने तुम्ही घाबरून जाल. सकारात्मक विचार आणि उजळ बाजू विचारात घेतली तर भीती दूर लोटू शकाल. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. जवळच्या नातेवाईकांची, त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा असेल पण त्याचबरोबर ते तुम्हाला आधार देतील, काळजी घेतील. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका, आपल्या मताचे खूप कौतुक होऊ शकते. तुमच्या जोडीदारामुळे तुमची योजना किंवा प्रकल्प बारगळेल, संयम सोडू नका.
उपाय :- चांगल्या आरोग्यासाठी 11 वेळा ॐ शुक्राय नमः मंत्राचा जप करा.