Main Featured

'सडक 2' विरोधात सुशांतच्या चाहत्यांचा रोष; Shukriya गाण्याला लाइकच्या तिप्पट डिसलाइक


अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) प्रकरणात चिडलेल्या चाहत्यांकडून महेश भट्ट (mahesh bhatt) यांच्या सडक 2 (SADAK 2) या चित्रपटाला जोरदार विरोध होतो आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी आपला राग व्यक्त केला. या फिल्मचा ट्रेलर, (Sushant's fans angry against 'Road 2')त्यानंतर या फिल्मची गाणी ((SADAK 2 song) रिलीज झाली आहेत. दरम्यान ट्रेलरनंतर आता गाण्यांनाही डिसलाइक करण्याचं सत्र सुरूच आहे. ट्रेलरसह आतापर्यंत रिलीज झालेल्या सर्व गाण्यांना जास्त डिसलाइक मिळाले आहेत.
सडक 2 फिल्मचं गाणं शुक्रिया (Shukriya) रिलीज झालेलं आहे. या गाण्यावरही चाहत्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. हे गाणं रिलीज होताच नेटिझन्सनी या गाण्यालाही विरोध दर्शवला. काही वेळात याला 5 हजार लाइक्स मिळालेत. तर तब्बल 15 हजार डिसलाइक्स मिळाले आहेत.

Must Read

सडक-2 हा सिनेमा (Sushant's fans angry against 'Road 2')डिज्नी प्लस हॉटस्टारवर 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. महेश भट्ट यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt), पूजा भट्ट (Pooja Bhatt), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) यांच्यासह जिशु सेनगुप्ता, मकरंद देशपांडे, गुलशन ग्रोव्हर, प्रियंका बोस, मोहन कपूर आणि अक्षय आनंद देखील आहेत.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझम या मुद्द्यावरून वादंग निर्माण झाला आहे. नेपोटिझमवरून वाद सुरू असतानाच, स्टार किड्सना देखील सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. सडक-2 मधील मूख्य भूमिकेतील सर्वच कलाकार स्टार किड्सपैकी एक (Sushant's fans angry against 'Road 2')आहेत. सुशांतच्या निधनानंतर महेश भट्ट यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगची शिकार व्हावे लागले होते. त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या मुलींना घेऊन करण्यात आलेल्या या चित्रपटाला रोषाचा सामना करावा लागत आहे.

आधी ट्रेलर, त्यानंतर फिल्मची गाण्यांनाही सर्वात जास्त डिसलाइक मिळाले आहेत. त्यामुळे आता 28 ऑगस्टला फिल्म रिलीज झाल्यानंतर काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.